महाराष्ट्रातील राजकीय प्रदूषणाचे जनक मुख्यमंत्री शिंदेच : संजय राऊत | पुढारी

महाराष्ट्रातील राजकीय प्रदूषणाचे जनक मुख्यमंत्री शिंदेच : संजय राऊत

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्राच्या राजकारणात जे प्रदूषण वाढले आहे, त्याचे जनक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच आहेत, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केली आहे. नागपुरातील खासदार महोत्सवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात वक्तव्य करून ठाकरे गटाला लक्ष्य केले होते.

संजय राऊत म्हणाले, दादा भुसे सत्तेचा गैरवापर करत आहेत. दादा भुसे यांच्यासह सर्व मंत्री भ्रष्ट असून या सरकारचा पाया आणि कळस भ्रष्ट आहे. खोके मोजून हे सरकार आले आहे. आजकाल मुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवार बोलतात ती भाजपची स्क्रिप्ट आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना खोटे ठरविण्याचा भाजपचा प्रयत्न असून चारित्र्यहनन करत आहे. भाजपने पक्ष आणि घर फोडले, आता नेते फुटत नाहीत म्हणून चारित्र्यावर हल्ला केला जात आहे. अजित पवार आणि मिंधे गटाने जो मार्ग निवडला त्यानेच पुढे जावे, मात्र अजितदादा नाही तर भाजप बोलत असल्याची टीका राऊत यांनी केली.

हेही वाचा : 

Back to top button