Pawar Vs Awhad :’काकांचा खड्डा तर बहिणीचा राजकीय छळ’,आव्हाडांचा पवारांवर हल्लाबोल | पुढारी

Pawar Vs Awhad :'काकांचा खड्डा तर बहिणीचा राजकीय छळ',आव्हाडांचा पवारांवर हल्लाबोल

पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) दोन दिवसाच्या निर्धार नवपर्वाच्या वैचारिक मंथन शिबिर रायगडमधील कर्जतमध्ये आयोजित केले होते शुक्रवारी (दि.१) झालेल्या समारोप भाषणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार गटासंदर्भात बरेच गौप्यस्फोट केले. यानंतर शरद पवार गटाकडूनही त्यांना जोरदार प्रतित्यूर मिळू लागले आहे. राष्ट्रवादीचे (शऱद पवार गट) नेते जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ‘X’ खात्यावर पोस्ट करत अजित पवार यांचे नाव न घेता निशाणा साधला आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की,”त्या काकाला झालेल्या वेदना आणि डोळ्यातले आश्रु उभ्या महाराष्ट्राने बघितले.” (Pawar Vs Awhad)

Pawar Vs Awhad :आव्हाडांची पोस्ट व्हायरलं, “काकांचा खड्डा”

“जो स्वताच्या राजकिय स्वार्था साठी सख्या काकांचा खड्डा खणत होता. ह्याच काकांचा वारसा हवा होता. त्या काकाला झालेल्या वेदना आणि डोळ्यातले आश्रु उभ्या महाराष्ट्राने बघितले. जो सख्ख्या चुलत बहीणीचा राजकिय छळ करत होता. तिला संपवण्यासाठी अत्यंत हीन पातळीवर जाऊन बोलत होता. स्मशानातून आवाज येतात “माझ्या खुन्याला पकडा” तू आमचा हिशोब विचारणार.हिशोब लावून निष्ठा बदलत नाही. मी ज्यांनी दिला आसरा त्याचे घर जाळत नाही मी लक्ष्यात आहे ना… बात करने से पेहले खुद के गिरेबान मै झाक के देखो आणि हो भगीरत बियाणी नी आत्महत्या का आणि कुणामुळे केली? बोलता तुम्हाला येते तर मुका मी पण नाही माझ्या मागे काका ची पुण्याई न्हाई तर गाळलेल्या घामाची ताकत आहे.”

हेही वाचा 

Back to top button