Maharashtra Politics : 'पुराव्यांची बैलगाडी' रोहित पवारांनी फडणवीसांचा बैलगाडीतील फोटो केला शेअर | पुढारी

Maharashtra Politics : 'पुराव्यांची बैलगाडी' रोहित पवारांनी फडणवीसांचा बैलगाडीतील फोटो केला शेअर

पुढारी ऑनलाईन डेस्क :नऊ वर्षांपूर्वी अधिवेशनात आलेली अद्यापही पुराव्यांची बैलगाडी सभागृहात पोहचलेली नाही. बैलगाडी आणून काही लोकं सत्तेत तर आले; पण सत्तेत येताच बैलगाडीचा त्यांना विसर पडला”, अशी पोस्ट करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बैलगाडीतील फोटो राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहीत पवार यांनी शेअर केला आहे. रोहित पवार यांनी केलेली पोस्ट वाचा त्यांच्याच शब्दात. (Maharashtra Politics )

Maharashtra Politics : बैलगाडी आणून काही लोकं सत्तेत…

गेले काही दिवस राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते, आमदार रोहित पवार यांची युवा संघर्ष यात्रा सुरु आहे  युवा संघर्ष पदयात्रेच्या दुसर्‍या टप्प्याला चौंडी येथून सुरूवात झाली. पुणे ते नागपूर अशा पदयात्रेच्या दुसर्‍या टप्प्याला १६ नोव्हेंबर पासून सुरुवात झाली. ही युवा संघर्ष यात्रा नागपूर येथे हिवाळी अधिवेशनादरम्यान धडकणार आहे. दरम्यान रोहीत पवार यांनी आपल्या ‘X’ अकाउंटवर पोस्ट करत उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बैलगाडीतील जुना फोटो शेअर करत निशाणा साधला आहे.

हेही वाचा 

Back to top button