Supriya Sule Vs Chitra Wagh: “राज्याच्या मोठ्या ताई…” : चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळेंवर खोचक टीका | पुढारी

Supriya Sule Vs Chitra Wagh: "राज्याच्या मोठ्या ताई..." : चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळेंवर खोचक टीका

पुढारी ऑनलाईन डेस्क: कावीळ झालेल्यांना जसं सगळं पिवळं दिसतं, तशी तुमची स्थिती झाली आहे. त्यामुळे तुम्हाला जळी स्थळी देवेंद्र फडणवीस दिसताहेत. हा आजार बरा नव्हे, त्यामुळे राज्याच्या ताई तुम्ही लवकर उपचार घ्या आणि बऱ्या व्हा, अशी खोचक टीका चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर केली आहे. (Supriya Sule Vs Chitra Wagh)

मराठा आरक्षण आंदोलनामुळे राज्यभरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्याच्या कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज ( दि.१नाेव्‍हेंबर ) केली होती.  भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी त्यांच्या अधिकृत X सोशल मीडिया अकाऊंटवरून या संदर्भातील व्हिडिओसह पोस्ट करत  खासदार सुळे यांच्या मागणीवर सडकून टीका करत, जोरदार टोलेबाजी केली आहे. (Supriya Sule Vs Chitra Wagh)

तुमच्या भावाचा राग तुम्ही देवेंद्र फडणवीस यांच्यावर काढू नका

चित्रा वाघ यांनी म्‍हटले आहे की, तुमच्या भावाचा राग तुम्ही देवेंद्र फडणवीस यांच्यावर काढू नका किंवा असा प्रयत्न करू नका. कारण तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी त्याचा काहीच फायदा होणार नाही. तुमचा चिडचिडेपणा का वाढला आहे याचे कारण राज्यातील जनतेला पुरते ठावूक आहे. त्यामुळे तुम्ही लवकर उपचार घ्या आणि बऱ्या व्हा, असा सल्लाही त्‍यांन दिला आहे. (Supriya Sule Vs Chitra Wagh)

चित्रा वाघ यांनी व्हिडिओ आणि पोस्ट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, चंद्रशेखव बावनकुळे , सुनिल तटकरे आणि आशिष शेलार यांना देखील शेअर केली आहे. (Supriya Sule Vs Chitra Wagh)

हेही वाचा:

Back to top button