Manoj Jarange : …तर आज रात्रीपासून पाणीही सोडणार: मनोज जरांगे यांचा निर्वाणीचा इशारा

Manoj Jarange : …तर आज रात्रीपासून पाणीही सोडणार: मनोज जरांगे यांचा निर्वाणीचा इशारा

जालना: पुढारी वृत्तसेवा: कालचा अध्यादेश मान्य नाही. आरक्षण द्यायचे तर सरसकट द्या. अध्यादेशानुसार मागासलेपण सिद्ध करावे लागेल. ते किचकट आहे. त्याला खूप वेळ लागेल. आम्ही सरकारचे ऐकतो म्हणून तुम्ही काहीही करणार का ? तुम्हाला वाढीव वेळ का आणि कशासाठी पाहिजे, असा संतप्त सवाल करत आज रात्रीपासून पाणीही सोडणार, असा निर्वाणीचा इशारा मनोज जरांगे -पाटील यांनी सरकारला आज (दि.१) पत्रकार परिषदेत दिला. Manoj Jarange

ते पुढे म्हणाले की, त्यांच्या सगळ्यांच्याच गोळ्या संपल्या का ? मी बसायच्या आधी सांगायचे वेळ द्या. इथे माझे रक्त जळायचा टाईम आला. रक्त जळून द्या, मी हाडे सुधा जाळायला तयार आहे. पण त्यावर निर्णय करा. यांच्या मनात काय आहे, प्रॉब्लेम कळू द्या, त्यावर ठरवू वेळ द्यायचा का नाही. तुमच्या मनात काय आहे ते कळू द्या. तुम्हाला गरज असेल तर या. नाहीतर येऊच नका, आज रात्रीपासून पाणी सोडतो, असा इशारा जरांगे यांनी दिला. Manoj Jarange

सर्वपक्षीय बैठक झाली त्यांनी मागणी केली. वेळ वाढवून द्या. सर्व पक्ष कुठे होते, ते आतून सर्व एकच आहेत. आता वेळ कशासाठी पाहिजे. ते समोर येवुन सांगा. आरक्षण कसे द्यायचे, कधी देणार ते आम्हाला कळू द्या. त्यावर आम्ही ठरवू वेळ द्यायचा का नाही. पण वेळ मारून नेवू नका. तुम्हाला गरज असेल तर चर्चेला या, नसेल तर तिकडेच विमानात झोपा.

इंटरनेट बंद केले. यामागे षड्यंत्र असू शकते, असेल बाजार चाळे बंद करा, नेट सुरू करा. अन्यथा मराठे मागे हटणार नाहीत. सरकारने कितीही वातावरण खराब केले तरी आम्ही शांततेत आंदोलन करत राहणार आहे. उद्रेकाला आमचे समर्थन नाही. हिंसक आंदोलन करू नका. बीडमध्ये पोलिसांनी शांततेत बसलेल्या लोकांना उचलू नये. बळाचा वापर करू नका, असे आवाहन केले.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news