Eknath Shinde | वाघनखांना विरोध करणाऱ्यांनी अफझलखानाचा आदर्श स्वीकारलाय- मुख्यमंत्री शिंदे | पुढारी

Eknath Shinde | वाघनखांना विरोध करणाऱ्यांनी अफझलखानाचा आदर्श स्वीकारलाय- मुख्यमंत्री शिंदे

पुढारी ऑनलाईन डेस्क : वाघनखं महाराष्ट्रात आणणं प्रत्येकासाठी अभिमानास्पद आहे. पण काही विरोधी पक्षातील नेत्यांकडून याला विरोध होत आहे. वाघनखांवर आक्षेप घेत, अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. यावरून काही लोक सरकार आणि सरकारच्या प्रत्येक निर्णयाविरोध आहेत असे दिसते. आमच्या प्रत्येक कृतीवर शंका घेणाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श सोडून अफझलखानाचा आदर्श स्वीकारलेला दिसतोय, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केली आहे. मुबईतील ‘मेरी माटी, मेरा देश’ कार्यक्रमापूर्वी ते आज (दि.२७) माध्यमांशी बोलत होते. या कार्यक्रमाला दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित नव्हते.

संबंधित बातम्या

याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, एका बाजूला सुधीर मुनगंटीवार वाघनखं भारतात येण्यासाठी अथक प्रयत्नशील आहेत. तर दुसरीकडे काही लोक आमच्या सरकारविरोधी आहेत. ते आमच्या प्रत्येक कृतीवर द्वेष आणि मत्सर भावनेतून आक्षेप घेत आहेत, शंका व्यक्त करत आहेत. पण राज्याचे सांस्कृतिक मंत्रालय आणि आम्ही काम करत राहू. वाघनखं राज्यात येणारच. जे जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावण झालेले आहे ते सर्व आम्ही राज्यात आणू, असे आश्वासन देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.

तसेच भारत पाकिस्तान सीमेवर शिवरायांचा अश्वारूढ भव्य पुतळा उभा केला जाणार आहे. या पुतळ्याचे तोंड पाकिस्तानच्या दिशेने करण्यात येणार असून पाकिस्तानला देखील शिवाजी महाराजांच्या तलवारीच्या धारेची भिती वाटेल, अर्धे गर्भगळीत होतील. तसेच सीमेवर लढणाऱ्या भारतीय जवानांनादेखील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून प्रेरणा मिळेल, असेही मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांनी स्पष्ट केले आहे.

 

हेही वाचा:

Back to top button