शिवरायांची शपथ, मराठा आरक्षण देणारच : मुख्यमंत्री शिंदे | पुढारी

शिवरायांची शपथ, मराठा आरक्षण देणारच : मुख्यमंत्री शिंदे

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  राज्याच्या कानाकोपर्‍यातून आझाद मैदानावरील दसरा मेळाव्याला आलेल्या शिवसैनिकांसमोर बोलता बोलता शिवसेनेचे मुख्य नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक थांबले. व्यासपीठावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर गेले आणि नतमस्तक झाले. त्यानंतर शिवाजी महाराजांची शपथ घेत मराठा आरक्षण देणारच, असा शब्द उपस्थित जनसमुदायास दिला.

मुख्यमंत्री म्हणाले, मी सुद्धा सर्वसामान्य मराठा कुटुंबातील आहे. त्यामुळे मला तुमची दुःख कळतात. या एकनाथ शिंदेच्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मराठा समाजाला न्याय देणार. कोणाचेही आरक्षण न काढता मराठा समाजाला आरक्ष्ण देणार म्हणजे देणारच!

शिवसेना एकनाथ शिंदे गटाचा दसरा मेळावा आझाद मैदानात झाला. शिवतीर्थाप्रमाणेच आझाद मैदानावरील दसरा मेळाव्यावरही मराठा आरक्षण आंदोलनाचे आणि त्यातही पुन्हा आमरण उपोषणाला बसण्यास निघालेले मनोज जरांगे-पाटील यांचे सावट होते. त्याची दखल घेत मुख्यमंत्री म्हणाले, न्या. शिंदे समिती मराठा आरक्षणावर खूप काम करत आहे. सर्वोच्च न्यायालयात आपल्या सरकारने दाखल केलेल्या क्यूरेटीव्ह पिटीशनने एक मार्ग खुला केला आहे. तुम्ही थोडा धीर धरा. कोणाचेही आरक्षण न काढता मराठा समाजाला आरक्षण देण्याचा मी शब्द देतो. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री अस्ताना आम्ही आरक्षण दिले होते. ते सर्वोच न्यायलतात का टिकले नाही ते मी आता बोलणार नाही. तुम्ही संयम ठेवा, मुलबाळाना उघड्यावर टाकून आत्महत्या करण्यासारखे पाऊल उचलू नका, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.

काही लोक मराठा – ओबीसी, धनगर – आदिवासी संघर्ष निर्माण करण्याचे काम करत आहेत. या राज्याला हे संघर्ष चालणार नाहीत. राज्यात अस्थिरता निर्माण करुन माझे मुख्यमंत्रिपद अडचणीत येईल असे काही जणांना वाटते, पण तसे होणार नाही, असा इशारही त्यांनी विरोधकांना दिला.

उद्धव हमासशीही हातमिळवणी करतील

ज्या शिवतीर्थावरून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी गर्व से कहो हम हिंदू है असा नारा दिला, त्याच शिवतीर्थावरून आज हिंदुत्वाच्या बिचारांना मूठमाती दिली जात आहे. खुर्चीसाठी उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि समाजवाद्यांशी हातमिळवणी केली. वेळ आलीच तर ते एमआयएम, हमास आणि हिजबुलशी देखील हातमिळवणी करायला मागेपुढे पाहाणार नाहीत, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री शिंदे यांनी केली. सरकार पडल्यापासून उद्धव ठाकरे हे आता मुख्यमंत्री बदलाची वाट पहात आहेत. पण, लोकसभेत महायुती 45 जागा जिंकेल आणि त्यानंतर होणार्‍या विधानसभा निवडणुकीतही महायुतीचेच सरकार सत्तेवर येईल, असा ठाम विश्वासही मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखविला.

ते काँग्रेसमध्येही विलीन होतील

मुख्यमंत्री म्हणाले, दसरा मेळाव्यातून बाळासाहेबांनी गर्व से कहो हम हिंदू है हा नारा दिला आणि संपूर्ण देशात हिंदुत्वाचा जयघोष होऊ लागला, तो आपण सगळ्यांनी प्राणपणाने जपला. सत्तेची खुर्ची सोडली पण बाळासाहेबांचा विचार खाली पडू दिला नाही. पण, उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचा विचार बाजुला ठेवून सत्तेसाठी काँग्रेशी लाचारी पत्करली आहे. जिथे बाळासाहेबांचे विचार खुलेआम मांडता येतात,तेच आपल्यासाठी शिवतीर्थ आहे. बाळासाहेबांनी ज्या काँग्रेसचे वाभाडे काढले, त्यांचे गोडवे आज गायले जात आहेत. सावरकरांचा अपमान करणार्‍या ज्या मणिशंकर अय्यर यांना बाळासाहेबांनी जोडे मारले, त्याच कांगे्रसचे जोड़े आज हे उचलत आहेत हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. उद्धव ठाकरेंनी आपला उरलासुरला पक्ष काँग्रेसमध्ये विलिन केला तर आश्चर्य वाटायला नको, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला. ते म्हणाले,

आज हिंदुत्वाच्या पाठीत खंजीर खूपसण्याचे काम उद्धव ठाकरे यांनी केले आहे. काँग्रेस, समाजवादी अशा कुणाला डोक्यावर तर कुणाला खांद्यावर घेतलय. आता एमआयएमबरोबर युती करतील. हे कमी पडले तर हमासला कडेवर घेतील. हिजबुल मुज्जाहिद्दीन आणि लष्करे तोयबाचीही गळाभेट घेतील, असा हल्लाबोल मुख्यमंत्री शिंदे यांनी केला. राम मंदिरासाठी काढलेली रथयात्र कुणी आडवली, कारसेवकांना गोळीबार कुणी केला हे आपल्याला माहित आहे. बाळासाहेबांनी ज्यांना ज्यांना नाकारले त्यांचे तळवे चाटण्याचे काम तुम्ही करताय, मग महागद्दार कोण? आम्ही की तुम्ही, असा सवाल त्यांनी उद्धव ठाकरेंना विचारला.

आनंद दिघेंची संपत्ती विचारली

उद्धव ठाकरे यांनी कायम पक्षात नेत्यांचे पंख छाटण्यांचे काम केले. आनंद दिघे राज ठाकरे यांच्याबद्दल चांगले बोलले म्हणून त्यांचेही पंख छाटण्यांचे काम केले. त्यांच्या अंत्यसंस्काराला आले नाहीत. फक्त माझ्याकडे त्यांची कुठे कुठे मालमत्ता आहे याची विचारणा केली. यांना कार्यकर्त्यांशी काही देणेघेणे नाही. रक्ताचे नाते सांगणार्‍यांनीच बाळासाहेबांच्या विचारांचा गळा घोटलाय, त्यांची बांधिलकी फक्त पैशांशी आहे, असा पलटवार त्यांनी उद्धव यांच्यावर केला. निवडणूक आयोगाने आपल्याला शिवसेना आणि धनुष्यबाण दिल्यानंतर यांनी शिवसेनेच्या खात्यातील 50 कोटी बँकेकडे मागितले. बँकने ते देण्यास नकार दिला. बँक म्हणाली आयोगाने शिवसेना शिंदेंना दिलीय, तुम्हाला पैसे देता येणार नाहीत. मग निर्लज्जपणे त्यांनी आमच्याकडे पत्र पाठवले. आम्ही ते पैसे देऊन टाकले, असे सांगून पन्नास खोक्याचा आरोप आमच्यावर करता आणि आमच्याकडेच पन्नास कोटी मागता, असा सवाल त्यांनी केला. यांना आता खोके पुरत नाहीत, त्यांना जवळून ओळखणारे म्हणतात की यांना कंटेनर पाहिजे असतात. खोके चालत नाहीत, त्याचा साक्षीदार माझ्यापेक्षा दुसरा कोण असू शकतो? फक्त मी बोलत नाही. पण योग्य वेळी बोलेन, असा इशाराही शिंदे यांनी दिला.

कोविडमध्ये पैसे मोजत होतात

कोविडच्या काळात तुम्ही घरी बसला होता, मी पीपीई किट घालून रुग्णालयात जात होतो, रुग्णांना भेटलो, डॉक्टरांना बळ दिले, जीव धोक्यात घालून हे करत होतो, पण तुम्ही काय केले, लोक मरत होते आणि तुम्ही घरी बसून पैसे मोजत होता, डेड बॉ़डी बँग, कोविंड सेंटर, खिचडीत पैसे खाल्ले असा आरोप करताना या पापाचे उत्तर तुम्हाला द्यावेच लागेल. मुंबई महापालिकेच्या कामात दरवर्षी तुम्ही रस्ते दुरुस्तीत करोडो रुपये घेऊन काळ्याचे पांढरे आणि पांढर्‍याचे काळे करत होतात, ते देखील बाहेर येईल, असा हल्ला शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर चढविला.

शिवाजी महाराजांनाही उद्धव ठाकरे विसरले

काँग्रेसच्या नादाला लागून आता हे छत्रपती शिवाजी महाराजांना विसरले आहेत. शिवाजी महाराजांची वाखनखे लंडनहून इकडे आणण्याचा करार केला, पण हे वाघनखांवर संशय घेऊ लागले. छत्रपतींच्या शौर्यावर संशय घेऊ लागले आहेत. यांनी छत्रपतींचा आदर्श सोडलाय आणि अफझलखानाचा आदर्श घेतलाय म्हणून असे बोलत आहेत, असे शिंदे म्हणाले.

आणि उद्धवच टूणकन खुर्चीत जावून बसले

बाळासाहेबांना शब्द दिला आहे की शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवणार, त्याला पालखीत बसवणार असे उद्धव ठाकरे सांगत होते. आम्ही विचार करू लागलो कुठल्या शिवसैनिकाला बसवणार ? पण हे महाशय टुणकण उडाले आणि खुर्चीत जाऊन बसले. त्यांनी संधी येताच पवारांकडे दोन माणसे पाठवली आणि आपल्या नावाची शिफारस करा अशी विनंती केली, हे लपत नसते, असा खुलासा करताना 2004 पासूनच त्यांना खुर्चीवर बसायचे होते, पण जुगाड लागत नव्हता. जसे निवडणुकांचे निकाल आले तसे सगळे दरवाजे खुले केले. अरे तुम्ही युतीत लढला, मग दुसरे दरवाजे कसे शोधता? पण त्यांना काही करुन मुख्यमंत्री व्हायचे होते, तेंव्हा त्यांच्या भोळेपणाने तिकडे आहेत त्यांनी सावध व्हावे, चेहर्‍यावर जाऊ नका, सीतेचे हरण करण्यासाठी रावनाने साधूचे रुप धारण केले होते, तसे मुख्यमंत्री बनण्यासाठी उद्धव संधीसाधू बनले होते, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली. फडणविसांनी मुख्यमंत्री असताना कधी तुमचा शब्द पडू दिला नाही. मुंबईचा महापौर माझ्या शब्दावर त्यांनी केला. पण तुम्ही मुख्यमंत्री झाल्यावर त्यांना आता टाकण्याचा आणि मला अडकविल्याचा प्रायत्न केला. पण त्याआधी तुमचा टांगा मी पलटी केला, असा खोचक टोला शिंदे यांनी लगावला.

गहाण टाकलेली शिवसेना मी सोडवली

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाला तरी त्याचात काही बदल झाला नाही. मुख्यमंत्री झालो तरी मी कार्यकर्ता म्हणून काम करतोय, माझ्यातील कार्यकर्ता मरू दिला नाही.पण एका गरीब शेतकर्‍याच्या कुटुंबातला मुलगा मुख्यमंत्री झाला म्हणून एवढा काय पोटसूळ उठलाय, धनदांगडे, सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेल्यांनीच मुख्यमंत्री व्हायचे का? असा सवालही शिंदे यांनी केला. मोगलांच्या काळात त्यांच्या घोड्यांना पाणी पिताना संताजी धनाजी दिसयाचे तसा एकनाथ शिंदे तुम्हाला खूपतोय, काय पाप केले मी, हिंदुत्व वाचवले, गहाण टाकलेली शिवसेना वाचवली हेच ना? पहिल्या दिवसापासून सरकारपडणार, मुख्यमंत्री जाणार म्हणत होतात. पण सरकार आणखी मजबूत होत गेले. अजित पवारांनी सल

Back to top button