

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी मनोज जरांगे पाटील यांना भेटून मराठा समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. त्याचा कालावधी आता संपला आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बाबतीत कोणाच्या आरक्षणाला धक्का न लागता आरक्षण द्यायला पाहिजे. आरक्षण कस द्यायचं? हा सरकारचा निर्णय आहे. त्यांनी जे ठरवलं असेल ते करावे, अशी भूमिका माजी गृहमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी आज बोलून दाखविली.
ललित पाटीलला सरकारची साथ आहे का? असा सवाल विचारला जातोय यासंदर्भात छेडले असता, ससून हॉस्पिटलमध्ये तो 9 महिने कसा होता? बाहेर कसा गेला? सरकारची साथ असल्या शिवाय हे होऊ शकत नाही.मुळात मला गृह खात्यावर संशय आहे. गृह खात्याच्या पाठिंब्याशिवाय हे होऊ शकत नाही. महाराष्ट्राला उडता पंजाब करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे का? या प्रकारांची कडक चौकशी करून दोषींवर कडक कारवाई व्हायला पाहिजे असे देशमुख म्हणाले. पंकजा मुंडे यांनी काल २०२४ मधल्या निवडणुकीत त्यांची काय भूमिका असेल? ती मांडली त्या त्याच पद्धतीने पुढे जातील असे वाटते.
लोकसभेला ४५ जागा कशा निवडून आणतील, हे मुख्यमंत्र्यांनी सांगायला पाहिजे. फक्त फोडाफोडीचे राजकारण केले जात आहे. निवडणुका आल्या की जनताच त्यांना जागा दाखवेल असेही अनिल देशमुख यावेळी म्हणाले.
हेही वाचा