मुंबई : पुढारी वृत्तसेवा, माढा लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढणार नाही, याचा पुनरुच्चार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी गुरुवारी केला. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी भवनमध्ये गुरुवारी आयोजित आढावा बैठकीत अनेक पदाधिकार्यांनी पवार यांनी माढातून निवडणूक लढवण्याची इच्छा बोलून दाखवली.
संबंधित बातम्या
त्यावर पवार यांनी आपण माढाची लोकसभा निवडणूक लढवणार नाही. आगामी निवडणुकांमध्ये राज्यभरात दौरे करून संघटना मजबूत करण्यावर भर देणार असल्याचे स्पष्ट केले.
छगन भुजबळ हे त्यांच्या विरोधातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना विश्वासात घेत नव्हते. आता बरे झाले. त्यांनी पक्ष सोडला. आम्ही आता मोकळा श्वास घेत आहोत, अशी भावना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकार्यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासमोर व्यक्त केले.
नाशिक जिल्ह्यातील सर्वात जास्त आमदार हे अजित पवार गटाकडे असले तरी जनता तुमच्या सोबत आहे. भुजबळ जेव्हा होते, तेव्हा आमचा श्वास हा अडकला होता; पण आता तुम्ही सांगाल त्या उमेदवाराचा आम्ही प्रचार करू, असेही काही पदाधिकारी या बैठकीत म्हणाले.
हे ही वाचा :