सीएम उद्धव ठाकरे यांच्यावर आज शस्त्रक्रिया, मान, पाठदुखीचा त्रास असल्याने घेतला निर्णय | पुढारी

सीएम उद्धव ठाकरे यांच्यावर आज शस्त्रक्रिया, मान, पाठदुखीचा त्रास असल्याने घेतला निर्णय

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मान आणि पाठदुखीचा त्रास होत असल्याने त्यांच्या मानेवर शुक्रवारी सकाळी शस्त्रक्रिया केली जाणार आहे. एच. एल. रिलायन्स रुग्णालयात अर्थो सर्जन शेखर भोजराज हे ही शस्त्रक्रिया करणार आहेत. सकाळी सात वाजता ही शस्त्रक्रिया केली जाणार असून त्यानंतर दोन ते तीन दिवस मुख्यमंत्री रुग्णालयातच राहणार आहेत.

उद्धव ठाकरे यांना मान आणि पाठदुखीचा त्रास होत होता. हा त्रास बळावल्याने त्यांना मानेवर शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देण्यात आला होता. त्यामुळे बुधवारी संध्याकाळी मंत्रिमंडळाची बैठक संपताच मुख्यमंत्री रुग्णालयात दाखल झाले.

शस्त्रक्रिया न करता हे दुखणे राहाते का यासाठी प्रयत्न सुरू होते. मात्र मानदुखी थांबत नसल्याने डॉक्टरांनी त्यांना शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे कुटुंबीयांशी चर्चा केल्यानंतर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याप्रमाणे मान आणि खांद्याच्या मध्ये ही शस्त्रक्रिया होणार आहे. ती तासाभरात पूर्ण होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

हे ही वाचलं का?

 

Back to top button