वरुण गांधी म्हणतात, कंगना रनौतचे वक्तव्य म्हणजे वेडेपणा की देशद्रोह? | पुढारी

वरुण गांधी म्हणतात, कंगना रनौतचे वक्तव्य म्हणजे वेडेपणा की देशद्रोह?

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

बॉलीवूड अभिनेत्री कंगना रनाैतने नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर खऱ्या अर्थाने भारत स्वतंत्र झाला असे वक्तव्य केले होते. या वक्तव्यावर भाजप खासदार वरुण गांधी यांनी जोरदार टीका केली आहे. कंगना रनौत ही भाजपची खंदी समर्थक समजली जाते. त्याच भाजपच्या नेत्याने कंगाना रनाैतवर टीका केल्याने याकडे सर्वांचे लक्ष वेधले.

कंगना रनौतने ‘भारताला १९४७ मध्ये मिळाले स्वातंत्र्य ही भीक होती. खरे स्वातंत्र्य हे २०१४ साली मिळाले.’ असे वक्तव्य एका वृत्तवाहिनीशी बोलताना केले होते. विशेष म्हणजे कंगाना रनौतला नुकताच पद्मश्री पुरस्कार देण्यात आला आहे. कंगना रनौत ही आपल्या वदग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहे. तिच्या या वादग्रस्त वक्तव्यांमुळेत ट्विटरने तिचे ट्विटर अकाऊंट ब्लॉक केले आहे.

दरम्यान, कंगना रनौतच्या या वादग्रस्त वक्तव्याची व्हिडिओ क्लीप शेअर करत ‘कधी महात्मा गांधीजींच्या त्यागाचा अपमान, कधी त्यांच्या मारेकऱ्याचा सन्मान, आता शहीद मंगल पांडे पासून राणी लक्ष्मीबाई, भगत सिंंग, चंद्रशेखर आझाद, नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्यासह लोखो स्वातंत्र्य सैनिकांच्या बलीदानाचा तिरस्कार. या विचारधारेला मी वेडेपणा म्हणू की देशद्रोह?’ अशी पोस्ट लिहिली.

वरुण गांधी यांचा भाजप विरोधात पवित्रा

लखीमपूर खीरीमध्ये चिरडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना न्याय देण्याची मागणी असो किंवा कृषी कायद्याचा विरोध असो गेल्या काही दिवसांपासून भाजपचे नेते वरुण गांधी यांनी आपल्याच सरकावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. याचा परिणाम म्हणून भाजपने आपल्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीला वरुण गांधी यांना बोलावण्यात आले नव्हते.

कंगना रनौतच्या या वादग्रस्त वक्तव्यावर सोशल मीडियावर कमेंटचा पाऊस पडला. हजारो स्वतंत्र्य सेनानींच्या बलीदानाला कंगना रनौत भीक कशी म्हणू शकते. तर काहींनी कंगना रनौतला राणी लक्ष्मीबाई म्हणत तिचे समर्थनही केले. अकाली दलाचे वरिष्ठ नेते मनतिंदर सिंग सिरसा यांनी ट्विट करुन मणिकर्णिकाची भुमिका बजावणारा कलाकार भारताच्या स्वातंत्र्याला भीक कसे म्हणू शकते. लाखो लोक शहीद झाल्यानंतर मिळालेल्या स्वतंत्र्याला भीक म्हणणे ही कंगना रनौतची मानसिक दिवाळखोरी आहे.’

Back to top button