

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : ओबीसी समाजासाठी मंडल आयोगाने शिफारस केलेल्या २७ टक्के आरक्षणाची अंमलबजावणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि तत्कालिन मुख्यमंत्री शरद पवार यांनी केली होती. त्याबद्दल राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी पवार यांचे आभार मानले. त्यावेळी पवार यांना आरक्षण देण्याचा किंवा कमी करण्याचा अधिकार नव्हता. असे सांगून ओबीसी समाज हा देशाचा निर्मातकर्ता आहे. त्यामुळे आमची लायकी काढण्याचे काही कारण नाही, असे सांगत ओबीसी नेते व मंत्री छगन भुजबळ यांनी शासकीय सेवेत मराठा समाज वरचढ असताना ओबीसीतून आरक्षण कशासाठी असा सवाल केला. हिंगोली येथे आयोजित एल्गार सभेत ते आज (दि.२६) बोलत होते. Chhagan Bhujbal
मनोज जरांगे – पाटील यांनी उपस्थित केलेल्या लायकीच्या मुद्द्यावर भुजबळ यांनी यावेळी सडेतोड उत्तर दिले. संत मंत शूरवीर विचारवंत या सर्व क्षेत्रात ओबीसी समाजाचा दबदबा राहिला आहे. मराठा समाजाने ओबीसींशी नाद करायचा नाही, असा इशारा प्रकाश शेंडगे यांनी दिला. ओबीसी समाज एकवटला तर १६० काय तर महाराष्ट्रात मराठा नेत्यांचा सुफडासाफ होईल. मराठ्यांच्या ५८ मोर्चांना ओबीसीने समर्थन दिले. पण हा आमचा मोठा भाऊ आमच्याच ताटातील हिसकावून घेत आहे. Chhagan Bhujbal
मराठा समाज हा मागास नाही, हे सर्व आयोगाने मान्य केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने या समाजाला आरक्षण नाकारले आहे. त्यामुळे आता ओबीसींच्या कोट्यातून आरक्षण मागितले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. ओबीसी समाज राजकारणी बनला, तरच या समाजाचे प्रश्न सुटतील, असे रासपचे नेते महादेव जानकर यांनी यावेळी बोलताना सांगितले. यापुढे दलित – मुस्लिम समाजालाही आपल्यामध्ये घ्यावे लागेल, असे सांगून त्यांनी बुध्दीने राजकारण करुन समतावादी भूमी तयार करावी लागेल, त्यासाठी मतांच्या दृष्टीने समाजाने एकत्र येण्याची आवश्यकता व्यक्त केली.
हेही वाचा