Stock Market Closing Bell | IT आणि बँक शेअर्सनी बिघडला बाजाराचा मूड, नेमकं काय झालं?

Stock Market Closing Bell | IT आणि बँक शेअर्सनी बिघडला बाजाराचा मूड, नेमकं काय झालं?
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : देशातील आघाडीच्या आयटी कंपन्यांच्या महसूल वाढीतील कपात आणि मध्यवर्ती बँकांच्या वाढत्या व्याजदरवाढीची चिंतेने गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतली आहे. परिणामी भारतीय शेअर बाजारात आज शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी घसरण पाहायला मिळाली. विशेषतः आयटी आणि बँक शेअर्समुळे बाजाराचा मूड बिघडला. आजच्या ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्स सुमारे ४२४ अंकांनी घसरून ६५,९८४ वर आला. तर निफ्टी ५० ११७ अंकांनी घसरून १९,६७७ पर्यंत खाली आला. त्यानंतर सेन्सेक्स १२५ अंकांनी घसरून ६६,२८२ वर स्थिरावला. तर निफ्टी ४२ अंकांनी घसरून १९,७५१ वर बंद झाला.

संबंधित बातम्या 

आज क्षेत्रीय पातळीवर ऑटो आणि रियल्टी प्रत्येकी ०.५ टक्क्यांनी वाढले. तर पीएसयू बँक आणि आयटी ०.५-१ टक्क्यांनी घसरले. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक सपाट पातळीवर बंद झाले

IT सेवा उद्योग मंदीचा सामना करत असल्याच्या पार्श्वभूमीवर इन्फोसिसने (Infosys) आर्थिक वर्ष २०२४ साठी महसूल वाढीचे उदिष्ट्‌य सलग दुसऱ्यांदा कमी केले आहे. तसेच एचसीएल टेकने या आर्थिक वर्षातील महसूल अंदाज कमी केला आहे. यामुळे आजच्या व्यवहारात आयटी शेअर्स घसरले. बँकिंग शेअर्समध्येही आज घसरण झाली. ॲक्सिस बँक आणि एसबीआय यांचे शेअर्स सर्वाधिक घसरले.

तसेच अमेरिकेत ग्राहकोपयोगी वस्तूंच्या किमती अपेक्षेपेक्षा जास्त वाढल्या आहे. यामुळे फेडरल रिझर्व्ह दीर्घकाळ उच्च व्याजदर कायम ठेवू शकते अशी शक्यता निर्माण झाली आहे. याचे पडसाद शेअर बाजारात उमटत आहेत.

इन्फोसिसचा शेअर घसरला

सेन्सेक्सवर इन्फोसिसचा शेअर सुरुवातीला ३ टक्क्यांनी खाली आला. त्यानंतर हा शेअर २.३१ टक्क्यांच्या घसरणीसह १,४३० रुपयांवर स्थिरावला. ॲक्सिस बँकेचा शेअर २.३० टक्क्यांनी घसरून ९९४ रुपयांवर आला. एसबीआय, विप्रो, एचडीएफसी बँक, टाटा स्टील, जेएसडब्ल्यू स्टील, आयटीसी, ॲक्सिस बँक हे शेअर्सही घसरले. दरम्यान, टाटा मोटर्सचा शेअर टॉप गेनर राहिला. हा शेअर सुमारे ५ टक्क्यांनी वाढून ६६७ रुपयांवर गेला. इंडसइंड बँक, एचसीएल टेक, नेस्ले इंडिया, मारुती, सन फार्मा, टीसीएस, बजाज फिनसर्व्ह, पॉवर ग्रिड हे शेअर्सही वाढले.

अमेरिका, आशियाई बाजारात दबाव

संपूर्ण आशियाई आणि अमेरिकेतील बाजारात दबावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. आशियाई बाजारात आज घसरण दिसून आली. चीनचा ब्लू चीप स्टॉक निर्देशांक CSI300, हाँगकाँगचा हँगसेंग, जपानचा निक्केई निर्देशांक घसरला. अमेरिकेच्या शेअर बाजारातील डाऊ जोन्स इंडस्ट्रियल ॲव्हरेज (Dow Jones Industrial Average) काल गुरुवारी ०.५ टक्क्यांनी घसरून बंद झाला होता. एस अँड पी ५०० आणि नॅस्डॅक कंपोझिट (Nasdaq Composite) हेदेखील घसरले होते.

परदेशी गुंतवणूकदारांकडून विक्री

दरम्यान, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FIIs) गुरूवारी सलग १७ व्या सत्रांत विक्रीचा सपाट सुरुच ठेवला. त्यांनी एका दिवसात १,८६३ कोटी रुपयांच्या भारतीय शेअर्सची विक्री केली आहे.

कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ

दरम्यान, अमेरिकेने रशियन कच्च्या तेलाच्या निर्यातीवरील निर्बंध कार्यक्रम कडक केल्याने शुक्रवारी तेलाच्या किमती वाढल्या आहेत. अमेरिकेने रशियन कच्च्या तेलाच्या निर्यातीवरील निर्बंध कार्यक्रम कडक केल्याने शुक्रवारी तेलाच्या किमती वाढल्या आहेत. आज शुक्रवारी तेलाच्या किमतीत २ डॉलरने वाढ झाली. ब्रेंट फ्यूचर्स २.२८ टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल ८७.९६ डॉलर झाले.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news