Israeli Couple : हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायली दाम्पत्याचे ‘ते’ अखेरचे ह्रदयद्रावक क्षण; १० महिन्यांच्या जुळ्या बाळांचे रक्षण | पुढारी

Israeli Couple : हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायली दाम्पत्याचे 'ते' अखेरचे ह्रदयद्रावक क्षण; १० महिन्यांच्या जुळ्या बाळांचे रक्षण

पुढारी ऑनलाईन डेस्क : इस्त्राइलवर हमासने केलेल्या हल्ल्यात एक ह्रदयद्रावक घटना समोर आली आहे. एका इस्त्रायली जोडप्याने (Israeli Couple) हमासने केलेल्या हल्ल्यादरम्यान १० महिन्यांच्या जुळ्या मुलांचे रक्षण करताना आपला जीव गमावला. इताई आणि हदर बर्डिचेव्हस्की असे या जोडप्याचे नाव आहे. गाझापासून तीन मैल पूर्वेला असलेल्या किबुट्झ या केफर गाझामध्ये ही हृदयद्रावक घटना उघडकीस आली.

द इंडिपेंडंटने दिलेल्या माहितीनुसार, इटाई आणि हदर बर्डिचेव्हस्की या जोडप्याने त्यांच्या घरावर हल्ला करणाऱ्या हमासच्या कार्यकर्त्यांशी सामना केला. त्यांच्या स्वत: च्या जीवाला धोका असूनही त्यांनी त्यांच्या मुलांना आश्रयस्थानात लपविले. त्यांनी आपल्या १० महिन्यांच्या जुळ्या बाळांचे इस्त्रायली सैनिकांपासून जवळपास १२ तास हल्ल्यापासून रक्षण केले.

सायप्रसमधील इस्रायलचे उप राजदूत रोटेम सेगेव्ह यांनी बर्डिचेव्हस्की दाम्पत्याने दाखवलेल्या प्रगल्भ शौर्याचे कौतुक केले. एका सोशल मीडिया पोस्टमध्ये, त्यांनी या जोडप्या बाबत माहिती दिली. यामध्ये त्या म्हणाल्या की, “इटाई आणि हदर बर्डिचेव्हस्की हे 30 वर्षांचे जोडपे. दहशतवादी त्यांच्या घरात घुसल्यानंतर त्यांनी दहा महिन्यांच्या जुळ्या बाळांना आश्रयस्थानात लपवून ठेवले होते. दहशतवाद्यांशी जोरदार लढा दिल्यानंतर त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. .”

Back to top button