Prakash Awade : प्रकाश आवाडे यांच्या निवासस्थानी बैठक, विधानपरिषदेसाठी राहुल आवाडे यांच्या नावाची चर्चा

Prakash Awade : प्रकाश आवाडे यांच्या निवासस्थानी बैठक, विधानपरिषदेसाठी राहुल आवाडे यांच्या नावाची चर्चा
Published on
Updated on

विधान परिषदेसाठी जिल्हा परिषदेपाठोपाठ निर्णायक मतदार संख्येमुळे इचलकरंजी शहर विजयासाठी प्रमुख मदार ठरणार आहे. या अनुषंगाने शहरातूनही राजकीय हालचालींना वेग आला आहे. मंगळवारी आमदार प्रकाश आवाडे (MLA Prakash Awade)  यांच्या निवासस्थानी ताराराणी पक्ष व आवाडे समर्थकांच्या प्रमुख पदाधिकार्‍यांची बैठक झाली. या बैठकीतील चर्चेचा तपशिल समजू शकला नाही. विधान परिषद निवडणुकीसाठी राहुल आवाडे यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवण्यात येईल अशीही चर्चा आहे.

इचलकरंजीतील मतदारांची संख्या 67 आहे. शहरातूनही निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. आ. आवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्या निवासस्थानी बैठकही पार पडली. प्रकाश दत्तवाडे, प्रकाश मोरे, नगरसेवक सुनील पाटील, जि.प.सदस्य राहुल आवाडे, स्वप्निल आवाडे आदींसह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

आवाडे गटाकडे सध्या इचलकरंजी पालिकेतील 19 पैकी 16, हुपरी नगर परिषदेतील 5 सदस्य आहेत. तर, जिल्हा परिषद, पंचायत समिती आदी ठिकाणीही वर्चस्व आहे. आ. आवाडे भाजपचे सहयोगी सदस्य आहेत. त्यामुळे त्यांचा निर्णयही निर्णायक ठरणार आहे. या निवडणुकीत मनी अँड मसल पॉवरचा प्रभाव अधिक असल्यामुळे या लढाईत कोण उतरणार आणि कोण लढतो याकडेही मतदार असलेल्या सदस्यांचे लक्ष आहे.

MLA Prakash Awade :  माजी आमदार हाळवणकर यांच्या उमेदवारीचीही चर्चा

माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनाही भाजपकडून विधान परिषदेच्या निवडणुकीत उतरवण्याच्या हालचाली सुरू असल्याचीही जोरदार चर्चा आहे. आ. आवाडे भाजपचे सहयोगी सदस्य आहेत. त्यांच्या गटासह जिल्ह्यातील भाजप व मित्रपक्षांचे त्यांना पाठबळ मिळू शकते. या धोरणासह जिल्ह्यातील तसेच भाजपतील वरिष्ठ पातळीवरील काही नेते हाळवणकर यांना या निवडणुकीत उतरवण्यासाठी प्रयत्नशील असल्याची चर्चा आहे.

हातकणंगलेत आवाडे, कोरे गटाची भूमिका ठरणार निर्णायक

हातकणंगले : जिल्हा बँकेच्या सुरू असलेल्या घडामोडी, हुपरी, इचलकरंजीतील आ. प्रकाश आवाडे यांची, तर पन्हाळा, मलकापूर नगरपालिकेतील आ. विनय कोरे यांची सदस्यसंख्या विचारात घेता कोरे, आवाडे या दोघांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. हातकणंगले तालुक्यातून विधान परिषदेसाठी इचलकरंजी नगरपालिकेत 61, वडगाव नगरपालिकेता 17, हुपरी नगरपरिषद 18, हातकणंगले नगर परिषदेत 17 आणि जिल्हा परिषद सदस्य 11 असे एकूण 125 मतदार आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news