World Tourism Day : पर्यटन दिनानिमित्त आयआरसीटीसीची विमान तिकिटावर विशेष ऑफर | पुढारी

World Tourism Day : पर्यटन दिनानिमित्त आयआरसीटीसीची विमान तिकिटावर विशेष ऑफर

मुंबई : इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने ((IRCTC)) 24 व्या स्थापना दिन व जागतिक पर्यटन दिनानिमित्त विमान तिकीट बूक करणार्‍या प्रवाशांना 25 ते 27 सप्टेंबरदरम्यान अनेक ऑफर्स दिल्या आहेत. यामध्ये आयआरसीटीसीच्या वेबसाईटवरून विमान तिकीट काढणार्‍या प्रवाशांना 2 हजारांपर्यंत सूट मिळणार आहे. (World Tourism Day )

विमान तिकीट बूक करणार्‍या ग्राहकांकडून आयआरसीटीसी कोणतेही सुविधा शुल्क आकारणार नाही. आयआरसीटीसीच्या एअर तिकीट पोर्टलद्वारे, तसेच मोबाईल अ‍ॅपद्वारे तिकीट बूक करता येणार आहे. तिकीट बूक करून या ऑफरचा लाभ घेता येईल, असे आयआरसीटीसीच्या वतीने सांगण्यात आले. शून्य सुविधा शुल्कासह आयआरसीटीसीने विविध बँकांच्या कार्ड व्यवहारांवर हवाई तिकिटांवर दोन हजार रुपयांपर्यंत सूट देऊन इतर ऑफरदेखील सुरू केल्या आहेत. आयआरसीटीसीने निवेदनात म्हटले आहे की, मर्यादित कालावधीच्या सवलतीशिवाय आयआरसीटीसी एअर, सरकारी अधिकार्‍यांसाठी सवलत देण्यात येणार आहे. (World Tourism Day )

सुविधा शुल्क म्हणजे काय?

जेव्हा तुम्ही तिकीट बूक करता तेव्हा तिकीट भाड्याव्यतिरिक्त तुमच्याकडून पैसेदेखील आकारले जातात, ज्याला सुविधा शुल्क म्हणतात; पण IRCTC च्या हवाई ऑफरमुळे हे अतिरिक्त पैसे मोजावे लागणार नाहीत. तुम्हाला फक्त तुमच्या आवडत्या क्लास आणि सीटसाठी पैसे खर्च करावे लागतील. ऑफरचा लाभ घेण्यासाठी खठउढउ च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
IRCTC त्याच्या पोर्टलद्वारे बूक केलेल्या सर्व हवाई तिकिटांवर 50 लाख रुपयांचा प्रवास विमादेखील मिळणार आहे. (World Tourism Day )

हेही वाचा : 

Back to top button