World Tourism Day 2023 : ५७ देशांत व्हिसा फ्री सफर | पुढारी

World Tourism Day 2023 : ५७ देशांत व्हिसा फ्री सफर

आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताच्या पासपोर्ट निर्देशांकामधील स्थितीत सुधारणा झाली आहे. यामुळे 57 देशांमध्ये भारतीय पासपोर्टधारकांना व्हिसा फ्री प्रवेश मिळणार आहे. या सुविधेमुळे एक आठवड्यापासून तीन महिन्यांपर्यंत सफर करण्याची संधी भारतीय पर्यटकांना उपलब्ध झाली आहे. यासाठी भारतीय पर्यटकांना दिशानिर्देशही जारी केले आहेत. (World Tourism Day 2023)

9.5 खर्व डॉलर : युनोशी संलग्न असणार्‍या वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशनुसार कोव्हिड-19 नंतर पर्यटनामध्ये वाढ झाली आहे. आगामी वर्षातही या क्षेत्रात मोठी उलाढाल होणार आहे. 9.5 खर्व डॉलरएवढी आर्थिक उलाढाल पुढील वर्षी अपेक्षित आहे. कोव्हिड-19 मुळे जगभरातील पर्यटन क्षेत्राला मोठा फटका बसला होता. जगात 2.6 खर्व डॉलर एवढी आर्थिक झळ बसल्याचे या संस्थेने म्हटले आहे. (World Tourism Day 2023)

संबंधित बातम्या 

 

  • संबंधित व्हिसा फ्री देशात लँडिंग केल्यानंतर पर्यटकांना ऑनलाईन अथवा ऑफलाईन रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे. त्यासाठीचे निर्धारित शुल्क अदा करावे लागणार आहे.
  • मालदिव, मॉरिशिअस, सेनेगल, कझाकिस्तान, सेंट व्हिन्सेट, फिजी, भुतान, ओमन, इराण, जॉर्डन, जमैका, नेपाळ, श्रीलंका, थायलंड, झिम्बाब्वे आदी 57 देशांत भारतीयांना व्हिसा फ्री प्रवेश मिळणार आहे.
  • सिंगापूरचा पासपोर्ट जगात अव्वल आहे. या देशातील नागरिक जगातील 192 देशांची सफर व्हिसाशिवाय करू शकतात.

पर्यटनासाठी भारतातील टॉप 10 ठिकाणे

ताजमहाल, आग्रा (उत्तर प्रदेश), हवामहल, जयपूर (राजस्थान), कुतूबमिनार (दिल्ली), जिम कॉर्बेट नॅशनल पार्क, रामनगर (उत्तराखंड), सुवर्णमंदिर (अमृतसर), सूर्यमंदिर, कोणार्क (ओडिशा), अजिंठा आणि वेरूळ लेणी (छत्रपती संभाजीनगर), खजुराहो मंदिर (मध्य प्रदेश), हूमाँयू मकबरा (दिल्ली).

  • 27 सप्टेंबर 1980 पासून आंतरराष्ट्रीय पर्यटन दिन साजरा केला होता. सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि आर्थिक मूल्यांबाबत जागृती करण्यासाठी हा दिन साजरा केला जातो.
  • आंतरराष्ट्रीय पर्यटनदिनानिमित्त संयुक्त राष्ट्रांंंतर्गत उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. यानुसार सदस्य देशांतील पर्यटनमंत्री सौदी अरेबियात एकत्र येणार आहेत.
  • युनोच्या वतीने टुरिझम रिकव्हरी ट्रकरची सुविधाही करण्यात आली आहे. ट्रकरच्या माध्यमातून विमानांचे बुकिंग, हॉटेल्ससह विविध बाबींची माहिती मिळू शकते. (World Tourism Day 2023)

हेही वाचा: 

Back to top button