Vijay Wadettiwar : दुष्काळाच्या झळा किती तीव्र आहे याची माहिती सरकारला आहे का? वडेट्टीवारांची सरकारवर टीका

पुढारी ऑनलाईन डेस्क : यंदा पावसाने शेतकऱ्यांचा जीव मेताकुटीला आणला आहे. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी आपल्या ‘X’ खात्यावर एक पोस्ट करत सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, “आपल्याला काय ? आपल्याला फक्त आश्वासन देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसून मोकळं व्हायचं आहे, हाच पॅटर्न सरकार चालवताना महायुतीने हाती घेतला आहे.” वाचा सविस्तर बातमी. ( Vijay Wadettiwar)
संबधित बातम्या
- “मी पालकत्व कसे करावे, हे कोणी शिकविण्याची गरज नाही”; विखे-पाटलांचे बाळासाहेब थोरातांना प्रत्युत्तर
- अहमदनगर : तुम्ही पालकमंत्रीच रहा, मालक बनू नका; बाळासाहेब थोरतांचा विखे-पाटलांना टोला
Vijay Wadettiwar : शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसून…
राज्यभर पाऊस असंतुलित पडल्याने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी आपल्या ‘X’ खात्यावर एक पोस्ट करत सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की,
“महाराष्ट्रात दुष्काळाच्या झळा किती तीव्र आहे याची माहिती सरकारला आहे की नाही हा प्रश्न आहे. गेल्या अडीच महिन्यांमध्ये राज्यात अत्यंत कमी पाऊस पडला आहे. हीच परिस्थिती राहिली तर आगामी काळात दुष्काळाचं मोठं संकट महाराष्ट्रावर येऊ शकतं ही शक्यता वर्तविण्यात येत आहे.
राज्यातील खालील जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यात सरासरी 45 टक्के कमी पाऊस झालाय.
- सांगली तही सरासरी 45 टक्के कमी पाऊस.
- नांदेड मध्ये सरासरीच्या 19 टक्के कमी.
- सोलापुर सरासरीच्या 35 टक्के कमी.
- सातारा सरासरीच्या 40 टक्के कमी
- छत्रपती संभाजीनगर सरासरी 27 टक्के कमी.
- जालना सरासरीच्या 43 टक्के कमी
- बीड मध्ये सरासरीच्या 43 टक्के कमी.
- धाराशिव मध्ये सरासरीच्या 32 टक्के कमी.
- परभणी सरासरीच्या 31 टक्के कमी अ
- मरावती सरासरीच्या 30 टक्के कमी.
- वाशिम सरासरीच्या 22 टक्के कमी.
- अकोला सरासरीच्या 29 टक्के कमी पाऊस झालाय.
दुष्काळी संकट आणि सरकारच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांनी जीवन संपवल्याचे प्रमाण वाढल्याचे अहवाल पुढे आले आहे. आपल्याला काय? आपल्याला फक्त आश्वासन देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसून मोकळं व्हायचं आहे, हाच पॅटर्न सरकार चालवताना महायुतीने हाती घेतला आहे. असे म्हणतं वडेट्टीवार यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
महाराष्ट्रात दुष्काळाच्या झळा किती तीव्र आहे याची माहिती सरकारला आहे की नाही हा प्रश्न आहे. गेल्या अडीच महिन्यांमध्ये राज्यात अत्यंत कमी पाऊस पडला आहे. हीच परिस्थिती राहिली तर आगामी काळात दुष्काळाचं मोठं संकट महाराष्ट्रावर येऊ शकतं ही शक्यता वर्तविण्यात येत आहे.
राज्यातील खालील… pic.twitter.com/GQXejHQcdW
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) September 21, 2023
हेही वाचा