अहमदनगर : तुम्ही पालकमंत्रीच रहा, मालक बनू नका; बाळासाहेब थोरतांचा विखे-पाटलांना टोला

अहमदनगर : तुम्ही पालकमंत्रीच रहा, मालक बनू नका; बाळासाहेब थोरतांचा विखे-पाटलांना टोला

संगमनेर, पुढारी वृत्तसेवा : संगमनेर तालुक्यातील अधिकारी आणि कर्मचार्‍यांवर दहशत करण्यापेक्षा दुष्काळाकडे गांभीर्याने बघा, दहशत करून किंवा धमक्या देऊन संगमनेरचा विकास तुम्ही रोखू शकत नाही. थोडे लक्ष राहाता तालुक्यातही घाला. तेथील जनतेला लोक प्रतिनिधी म्हणून आपली त्यांना अधिक आवश्यकता आहे. तुम्ही जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यामुळे पालक म्हणून राहा, मालक असल्यासारखे वागू नका, असा इशारा काँग्रेस विधिमंडळ पक्ष नेते बाळासाहेब थोरात यांनी पालकमंत्री विखे यांना दिला.

आ. थोरात म्हणाले, पालकमंत्री राधा कृष्ण विखे हे पालकाची भूमिका विसरून मालकाच्या भूमिकेत असल्यासारखे वागतात. संगमनेरमध्ये येऊन अधिकारी कर्मचार्‍यांसह विकास कामे पूर्णत्वाकडे नेणार्‍या कंत्राटदारांना धमक्या देतात, त्यांच्या वर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. संगमनेरचा विकास त्यांना बघवत नसल्याने, त्यांचा राग मी समजू शकतो. दादागिरी करूनही संगमनेरची जनता वाकायला तयार नाही, त्यामुळे त्यांच्यामध्ये वैफल्यग्रस्त भावना तयार झाली आहे.

दुसरीकडे तलाठी भरती, वाळू धोरण याचा पुरता बोजवारा उडाला आहे ,लंपी आजार थांबलेला नाही तो उलट वाढतो आहे. त्यामुळे आपला राग काढायला ते संगमनेरमध्ये येत असतात. मात्र, येथे येऊन ते जर दहशतीची भाषा करणार असाल तर संगमनेरची जनता कदापी ही सहन करणार नाही, असा इशारा थोरात यांनी पालकमंत्री विखे यांना दिला

निळवंडे धरणातून जेव्हा चाचणी केली तेव्हाच जर अजून महिनाभर पाणी सुरू ठेवले असते तर संगमनेर तालुक्यातजाण वत असलेली दुष्काळाची दाहकता कमी झाली असती. संगमनेर, राहता व कोपरगाव तालुक्यातील जनतेच्या जीवनात आनंद निर्माण झाला असता तोच न बघवल्याने तातडीने पाणी बंद करण्यात आले, असा उपरोधिक टोला लगावत सध्यस्थितीची दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता निळवंडे च्या डाव्या कालव्याला पाणी सोडावे या मागणीसाठी संगमनेर कोपरगाव राहता आणि राहुरी, तालुक्यातील जनता मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्याच्या आग्रही मागणीसाठी संगमनेरमध्ये आली होती. मात्र त्यांचा टाहो ऐकण्यासाठी तुमच्याकडे वेळ नाही अशी टीका
बाळासाहेब थोरात यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर केली.

हेही वाचलंत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news