Ajit Pawar : ‘एक देश, एक निवडणूक’ देशाच्या हिताची: अजित पवार

Ajit Pawar : ‘एक देश, एक निवडणूक’ देशाच्या हिताची: अजित पवार

पुढारी ऑनलाईन डेस्क : एक देश, एक निवडणूक अशी चर्चा देशभरात सुरु आहे. एक देश एक निवडणुकीची देशाला नितांत गरज आहे. यामुळे खर्च कमी होतो. निवडणुकांमुळे आचारसंहिता लागल्याने बरेच प्रश्न निर्माण होतात.  प्रशासकीय कामे करता येत नाही, अधिकाऱ्यांना आदेश देता येत नाही. देशात कुठे ना कुठे निवडणुका असतात. दरम्यान आचारसंहितेमुळे ४-५ महिने काम ठप्प राहते. आणि अशी कामे ठप्प राहणे, या काळात परवडणार नाही, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना केले. (Ajit Pawar)

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (दि.१) माध्यमांशी बोलताना 'एक देश एक निवडणुक'चे समर्थन केले. ते म्हणाले की, एक देश एक निवडणुकीमुळे खर्च कमी होतो. निवडणुकांमुळे आचारसंहिता लागल्याने अनेक प्रश्न निर्माण होतात.  प्रशासकीय कामे करता येत नाही, अधिकाऱ्यांना आदेश देता येत नाही. देशात कुठे ना कुठे निवडणुका असताता. दरम्यान, आचारसंहितेमुळे ४-५ महिने काम ठप्प राहते. आणि असे काम ठप्प राहणे, या काळात परवडणारे नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक मुद्दा उचलून धरला होता. देशात एकच निवडणूक झाली, तर हिताचे ठरेल. आणि देशाला याची नितांत गरज आहे, असे माझेही स्पष्ट मत आहे. माजी राष्ट्रपती कोविंद यांची याबाबत समिती नेमली आहे. यावर ते अभ्यास करतील.

Ajit Pawar : देशाच्या विकासासाठी, हितासाठी एकत्र 

पुढे बोलताना ते म्हणाले की, "देशाच्या विकासासाठी, हितासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला सपोर्ट करण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. आज देशाला खऱ्या अर्थाने मोदींच्या नेतृृत्वाची गरज आहे. आम्ही सर्वजण जसे राज्यपातळीवर काम करत आहोत, तसे जिल्हा पातळीवरही काम करत आहोत. लोकसभेच्या निवडणुकीत जास्तीत जास्त जागा NDA ला मिळण्यासाठी आम्ही सर्वजण मिळून प्रयत्न करू.  महाराष्ट्रातूनही ४८ पैकी जास्तीतजास्त जागा निवडून आणण्यासाठी आमचे नियोजन सुरू आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news