PM Modi | मोठी बातमी! पंतप्रधान मोदी पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवणार? | पुढारी

PM Modi | मोठी बातमी! पंतप्रधान मोदी पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवणार?

पुढारी ऑनलाईन : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi)  पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा दिल्लीतील राजकीय वर्तुळात सुरु आहे. भाजपच्या उच्चपदस्थ नेत्याकडून ही माहिती मिळाल्याचे वृत्त ‘पुढारी न्यूज’ वृत्तवाहिनीने दिले आहे. पीएम मोदी पुण्यातून निवडणूक लढवण्यासाठी भाजपकडून चाचपणी केली असल्याचे राजकीय सुत्रांनी म्हटले आहे.

पीएम मोदी यांनी पुण्यातून लढवणे हे भाजपसाठी सोपे मानले जात आहे. काही सर्व्हेक्षणातून भाजपची महाराष्ट्रात पिछेहाट होण्याची शक्यता असल्याचे समोर आल्यानंतर भाजपकडून वेगवेगळे प्रयत्न केले जात आहे. जर पीएम मोदी पुण्यातून लढले तर पुणे, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यावर त्याचा प्रभाव जाणवेल, अशी रणनिती भाजपने आखली असल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे.

पीएम मोदी (Prime Minister Narendra Modi)  यांनी याआधी गुजरात आणि उत्तर प्रदेशमधून लोकसभा निवडणूक लढवली होती. आता ते पुण्यातून निवडणूक लढवू शकतात, असे सुत्रांनी म्हटले आहे.

महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक भाजपसाठी तेवढी सोपी नसल्याचे काही सर्व्हेतून समोर आले आहे. इंडिया टुडे आणि सी व्होटर्सच्या ताज्या सर्वेक्षणात महाराष्ट्रात भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीला केवळ २० जागा मिळण्याचा अंदाज आहे. तसेच शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या ‘इंडिया’ आघाडीला २८ जागा मिळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण ४८ जागा आहेत. अशा स्थितीत ताज्या सर्वेक्षणातून भाजपची पिछेहाट होणार असल्याचे चित्र समोर आले आहे.

इंडिया टुडेज आणि सी-व्होटर्सच्या मते महाराष्ट्रात विरोधकांच्या इंडिया आघाडीला २८ जागा मिळतील असे दिसत आहेत. विरोधी पक्षातील फुटीचा भाजपला फायदा होणार नसल्याचे स्पष्ट संकेत यातून देण्यात आले आहेत.

हे ही वाचा :

Back to top button