‘Mahayuti’ meeting: मुंबईत महायुतीची बैठक सुरू; मुख्यमंत्र्यांसह २ उपमुख्यमंत्री उपस्थित | पुढारी

'Mahayuti' meeting: मुंबईत महायुतीची बैठक सुरू; मुख्यमंत्र्यांसह २ उपमुख्यमंत्री उपस्थित

पुढारी ऑनलाईन: एका बाजूला देशातील विरोधी पक्षाच्या नेत्यांची मुंबईतील ग्रॅण्ड हयात हॉटेलमध्ये दोन दिवसीय बैठक सुरू आहे. या बैठकीचा आज दुसरा दिवस आहे. तर दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रातील महायुतीच्या सर्व खासदार, आमदार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे, हे विशेष आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे या बैठकीत (‘Mahayuti’ meeting)मार्गदर्शक करणार आहेत.

महायुतीच्या या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुख्य उपस्थिती असणार आहे. तर महायुतीचे सर्व पदाधिकारी देखील या बैठकीला हजर राहणार आहेत. या बैठकीत लोकसभेच्या महाराष्ट्रातील ४८ जागांवर चर्चा होणार असून, या जागा जिंकण्याचा निर्धार (‘Mahayuti’ meeting) करण्यात येणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे.

यावेळी पुढारी न्यूजशी बोलताना श्रीकांत शिंदे म्हणाले, द्वेष भावनेने विरोधी पक्ष आघाडी एकत्र आले आहेत. पण आमचं मिशन हे केवळ विकास असणार आहे. मुंबईत आज (दि.१ सप्टेंबर) महायुतीच्या बैठकीला (‘Mahayuti’ meeting) तिन्ही पक्षाचे महत्त्वाचे नेते उपस्थित राहिले आहेत.

हेही वाचा:

Back to top button