राज्यात डोळ्यांची साथ सुरूच; ५ लाख रुग्णांचा टप्पा पार | पुढारी

राज्यात डोळ्यांची साथ सुरूच; ५ लाख रुग्णांचा टप्पा पार

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : राज्यांमध्ये डोळ्यांच्या रुग्ण वाढत असून पाच लाखाहून अधिक रूग्ण राज्यात आहेत. पुणे जिल्हा आणि शहरात राज्यातील सर्वाधिक रूग्ण आहेत. तर गेल्या आठवड्यात ठाणे जिल्हय़ात रूग्णसंख्या दुप्पट झालेली आहे.

राज्यात आतापर्यंत तब्बल ५ लाख ७ हजार १०७ रूग्ण आढळले आहेत. डोळ्यांची साथीचे रूग्ण ग्रामीण भागामध्ये अधिक आहेत. आतापर्यंत बुलढाणा जिल्ह्यात सर्वाधिक रूग्ण होते मात्र या आठवड्यात पुणे जिल्हय़ात सर्वाधिक रुग्ण आहेत.

मुंबईत ५ हजार ९०७ रूग्ण आढळून आलेत. ठाणे जिल्ह्यात गेल्या आठवड्यात ५९१ रूग्ण होते मात्र या आठवडय़ात ११०७ रूग्ण आहेत तर ठाणे शहरात ११०९ रुग्ण आहेत मिरा भाईंदरमध्ये २१४ रूग्ण आहेत. वसई विरारमध्ये गेल्या आठवड्यात फक्त ४ रूग्ण आढळून आलेत. वसई विरारांमध्ये १५७ रूग्ण आहेत.

राज्यात उल्हासनगर महापालिका क्षेत्रामध्ये कमी रूग्ण आहेत गेल्या आठवड्याभरात फक्त ४ रूग्ण वाढले असून आतापर्यंत फक्त ४१ रुग्ण आढळले आहेत.

जिल्हानिहाय आकडेवारी :

पुणे – ४७८६६
कोल्हापूर – ९६८४
सोलापूर – ७०६९
पालघर – ८१४०
सांगली – २८०४
सातारा – ३५०४
रायगड – १८८१
सिंधुदुर्ग – १४५७
ठाणे – ११०७

हेही वाचा : 

Back to top button