Ajit Pawar : अजित पवारांच्या ‘या’ प्रॉपर्टींवर होणार कारवाई | पुढारी

Ajit Pawar : अजित पवारांच्या 'या' प्रॉपर्टींवर होणार कारवाई

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

मध्यरात्री राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने अटक केली. त्यानंतर आज सकाळी आयकर विभागाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची १००० कोटींची संपत्ती जप्त करण्याची नोटीस दिली आहे. अजित पवार यांच्याशी संबंधित पाच संपत्ती जप्त करण्याची नोटीस देण्यात आली आहे. त्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. (Ajit Pawar properties)

Ajit Pawar properties : अजित पवार हे गेल्या काही महिन्यांपासून आयटीच्या रडारवर

अजित पवार हे गेल्या काही महिन्यांपासून आयटीच्या रडारवर आहेत. गेल्या महिन्यात आयकर विभागाने दोन रिअल इस्टेट ग्रुप आणि अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या घर आणि कार्यालयांवर छापेमारी केली होती. यावेळी १८४ कोटींची बेहिशोबी मालमत्त्ता सापडली होती.

आयकर विभागाने ७ ऑक्टोबरपासून ७० हून अधिक ठिकाणांवर छापेमारी केली होती. अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या मालकीच्या अनंत मर्क्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीवरही छापा मारला होता. तसेच पवारांच्या बहिणींच्या मालकीच्या कंपन्यांवरही कारवाई करण्यात आली होती.

कोणकोणती संपत्ती जप्तीचे आदेश ?

जरंडेश्वर शुगर फॅक्ट्री बाजार मूल्य : सुमारे ६०० कोटी

साऊथ दिल्लीमधील फ्लॅट बाजार मूल्य : सुमारे २० कोटी

पार्थ पवार यांचे निर्मल ऑफिस बाजार मूल्य : सुमारे २५ कोटी

निलय नावाने गोव्यात बनलेला रिसॉर्ट बाजार मूल्य : सुमारे २५० कोटी

महाराष्ट्रात २७ वेगवेगळ्या ठिकाणी जमीन बाजार मूल्य : सुमारे ५०० कोटी

Back to top button