गिरीश महाजनांचा सरकारला टोला : ‘आर्यन खानला वाचवण्यासाठी सरकार पळत सुटले आहे’ | पुढारी

गिरीश महाजनांचा सरकारला टोला : 'आर्यन खानला वाचवण्यासाठी सरकार पळत सुटले आहे'

जळगाव; पुढारी वृत्तसेवा

कापूस, ज्वारी, केळी अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. यात सरकारने मदत जाहीर केली होती. दिवाळी आली मदत करू शेतकऱ्यांची दिवाळी गोड करू मात्र या सरकारने शेतकऱ्यांची दिवाळी काळी केली आहे असा टोला शेतकरी जन आक्रोश मोर्चावेळी आमदार गिरीश महाजन यांनी लगावला.

भाजपकडून जळगावमध्ये सरकार विरोधात आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माध्यमांशी बोलताना आमदार गिरीश महाजन म्हणाले की, अवकाळी पावसामुळे कापूस, ज्वारी, केळी, भाजीपाला या पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खिशात रुपया नाही. सरकारने मदत जाहीर केली होती. ही मदत दिवाळीला देणार असेही सांगितले होते. मात्र सरकारने शेतकऱ्यांची दिवाळी काळी केली आहे. एक दमडी सुद्धा सरकारने शेतकऱ्यांना दिलेली नाही या आघाडी सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे असा आरोप केला.

सरकारने विम्याचे निकष बदलल्याने शेतकऱ्यांच्या हातात काहीच आले नाही. शेतकरी अस्मानी संकटाने हवालदिल झालेला आहे. सर्व शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित केला आहे, ट्रान्सफार्मर बंद केले आहेत. शेतकऱ्यांना वीज मिळत नाही. वीज नसल्याव् पाणी पिकांना देता येत नाही असाही त्यांनी आरोप केला.

शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही आणि शासनाने शेतकऱ्यांना दमडीची मदतही केली नाही हे आघाडी सरकार आर्यन खान जेलमध्ये काय गेला महिन्याभरापासून संपूर्ण सरकार त्याच्या मागे पडले आहे. आर्यन खानला वाचवण्यासाठी पळत सुटले आहे असेही ते म्हणाले. मात्र शेतकरी मरत आहे त्याला विचारणार कोणी नाही आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांकडे बघण्यास एक मिनिट सुद्धा या सरकारकडे नाही असा टोलाही त्यांनी लगावला.

गांजा चरस अफीम यामध्ये गुरफटलेले सरकार आहे लाचखोरी मध्ये गुरफटलेले सरकार आहे यांचा जितका निषेध कराल तेवढा थोडा आहे असे यावेळी गिरीश महाजन म्हणाले.

हे ही वाचलं का?

 

Back to top button