Irshalwadi landslide : इर्शाळवाडी दुर्घटनेतील जखमींची मंत्री अदिती तटकरे यांनी रुग्णालयात घेतली भेट | पुढारी

Irshalwadi landslide : इर्शाळवाडी दुर्घटनेतील जखमींची मंत्री अदिती तटकरे यांनी रुग्णालयात घेतली भेट

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : खालापूर जवळील इर्शाळवाडी येथे दरड कोसळून जखमी झालेल्या नागरिकांवर कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी आज सकाळी या रुग्णांची भेट घेत विचारपूस केली. जखमींच्या उपचाराचा सर्व खर्च शासन करणार आहे.

यावेळी मंत्री तटकरे यांनी रुग्णांवर योग्य उपचार करण्यात यावे आणि या दुर्घटनेतील अजून जखमी नागरिक रुग्णालयात आल्यास प्रशासनाने सज्ज असावे, यासाठी डॉक्टरांशी चर्चा केली. यावेळी एमजीएमचे डॉ. सागर, पनवेल महापालिकेचे डॉ. गोसावी, पनवेलचे नायब तहसीलदार लाचके उपस्थित होते.

दरम्यान, या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबांना शासन पाच लाखांची मदत करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे. इथे सुरू असलेल्या बचाव कार्यावर देखील मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री स्वतः लक्ष ठेऊन आहेत.

हेही वाचा : 

Back to top button