Irshalwadi landslide : महाड तळीयेची खालापुरात पुनरावृत्ती; इर्शाळवाडीवर दरड कोसळून २०० हून अधिक लोक ढिगाऱ्याखाली | पुढारी

Irshalwadi landslide : महाड तळीयेची खालापुरात पुनरावृत्ती; इर्शाळवाडीवर दरड कोसळून २०० हून अधिक लोक ढिगाऱ्याखाली

ठाणे : पुढारी वृत्तसेवा : खालापूर इर्शाळवाडी या डोंगर पायथ्याशी असलेल्या गावावर बुधवारी मध्यरात्री दरड कोसळून २२८ नागरिक दरडी खाली सापडले. पहाटेपासून सुरू झालेल्या बचाव कार्यामध्ये ६० नागरिकांना बाहेर काढण्यात आले असून, यातील ५ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. याचवेळी मदतकार्यासाठी गेलेल्या एकाचा हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. बचाव कार्यासाठी पोहोचण्यात प्रशासनाला उशीर झाल्याने मदत वेळेत पोहोचू शकली नाही. त्यामुळे संपूर्ण वाडी रत्रभर ढिगाऱ्याखाली सापडली आहे.

ही दुर्घटना महाड तळीये वाडीची पुनरावृत्ती झाली असून, या वाडीतील ६० घरे आणि ४८ कुटुंबे दरडीखाली सापडली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, रायगडचे पालकमंत्री उदय सामंत, मंत्री दादा भुसे, गिरीश महाजन घटनास्थळी पोहोचले आहेत. अडकलेल्या नागरिकांना वाचविण्यासाठी प्रशासनाने बचावकार्य सुरू केले असून मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. एनडीआरएफ आणि टीडीआरएफचे जवान दरड बाजूला करण्याचे काम करत आहेत.

Back to top button