Ajit Pawar & Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी घेतलीअजित पवारांची भेट; कारण…. | पुढारी

Ajit Pawar & Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी घेतलीअजित पवारांची भेट; कारण....

पुढारी ऑनलाईन डेस्क : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारशी युती करत उपमुख्यमंत्री झाले. या प्रवेशानंतर पहिल्यांदाचा ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे अजित पवार यांच्या भेटीस गेले. त्यांच्या भेटीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यांच्या या भेटीवर राजकीय वर्तुळासह सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया येवू लागल्या आहेत. जाणून घेवूया जुन्या सहकाऱ्यांच्या भेटीमागील कारण  (Ajit Pawar & Uddhav Thackeray)

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी वर्षभरापूर्वी शिवसेनेत आपल्या काही समर्थकांसह बंड करत भाजपशी युती केली. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. वर्षभरानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार हे समर्थक आमदारांसह सरकारमध्ये सामील झाले. अजित पवार यांनी २ जुलै २०२३ राेजी उपमुख्यमंत्री पदाची शपथ (Ajit pawar latest) घेतली. या घडमोडीमुळे राज्याच्या राजकारणासह महाविकास आघाडीत राजकीय उलथापालथ झाली. या राजकीय नाट्यानंर पहिल्यांदाच ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे अजित पवार यांच्या भेटीस गेले होते.

Ajit Pawar & Uddhav Thackeray :  ‘चांगले काम करण्‍यासाठी शुभेच्‍छा दिल्‍या’

उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे अजित पवार यांच्या भेटीस गेले. त्यानंतर राजकीय वर्तुळासह सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया येवू लागल्या आहेत. त्यांच्या भेटीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होवू लागला आहे. या व्हिडिओमध्ये दिसत आहे की उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे अजित पवार यांना बुके देत असल्‍याचे दिसते. या बाबत बाेलताना  उद्धव ठाकरे म्‍हणाले की, अजित पवार यांची उपमुख्‍यमंत्री म्‍हणून निवड झाली आहे. त्‍यांनी चांगले काम करावे यासाठी त्‍यांना शुभेच्‍छा दिल्‍या.

हेही वाचा 

 

Back to top button