Maharashtra Politics | नीलम गोऱ्हेंच्या ‘त्या’ टीकेला सुषमा अंधारेंचे प्रत्युत्तर; म्हणाल्या, धोरणी राजकारणी…

Sushma Andhare
Sushma Andhare

पुढारी ऑनलाईन डेस्क : शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी शुक्रवारी शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला. या प्रवेशानंतर नीलम गोऱ्हे यांनी कोणत्याही सटरफटर लोकांमुळे नाराज होण्याची गरज नाही, असा टोला लगावला होता. त्यांच्या या टीकेला सुषमा अंधारे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. "तुम्ही धोरणी राजकारणी असू शकाल पण माणूस म्हणून भणंग आणि कफल्लक आहात. म्हणूनच पक्षप्रवेशावेळी सटरफटर काय तुमच्यासारखा सो कॉल्ड सुद्धा एकही माणूस तुमच्या सोबत दिसला नाही," अशी टीका अंधारे यांनी केली आहे. (Maharashtra Politics)

काही दिवसांपूर्वी विधान परिषद सदस्य मनीषा कायंदे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर नीलम गोऱ्हे यादेखील प्रवेश करतील, अशी चर्चा होती. वर्षभरापूर्वी पक्षात फूट पडल्यानंतरही गोऱ्हे या ठाकरे गटासोबत राहिल्या होत्या. मात्र, त्यांनी शुक्रवारी पक्ष सोडला. विधानभवनातील शिवसेनेच्या पक्ष कार्यालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काल नीलम गोऱ्हे यांनी प्रवेश केला. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वावर शिवसेना योग्य मार्गावर आहे. महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेनेत आपण कार्यरत राहणार असल्याचे स्पष्ट करत ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांच्यावर टीका केली. त्यांच्या या टीकेला अंधारे यांनी फेसबुक पोस्ट करून प्रत्युत्तर दिले आहे.

"महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून येण्याचा वकूब नसताना ज्या पक्षाने एवढं दिलं तो पक्ष आणि कुटुंब संकटात असताना, सत्तेसाठी पळ काढला. पण कुठलेही सत्तास्थान नसताना आमच्यासारखे निष्ठावान ठामपणे मातोश्री सोबत झुंज देत आहेत. तुमच्यासारखे खुर्च्या टिकवण्यासाठी छळ कपट करणाऱ्यांची भाटगिरी करत आहेत. म्हणूनच तुमच्या पक्षप्रवेशाच्या वेळी एकही सटरफटर काय तुमच्यासारखा सो कॉल्ड सुद्धा एकही माणूस तुमच्या सोबत दिसला नाही. यावरूनच आयुष्यात तुम्ही पैसा आणि पद खूप गमावली पण माणुसकी नाही हे स्पष्ट होते. ठाकरेंचा एक माणूस आपल्याकडे घेतला याचा मुख्यमंत्री शिंदे यांना कदाचित असुरी आनंद होईल. पण तुम्हाला घेण्याचा त्यांना एकही मत वाढवण्यासाठी म्हणून फायदा नक्कीच होणार नाही, असे अंधारे यांनी म्हटले आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news