Rahul Gandhi in 2024 Elections : गुजरात उच्च न्यायालयाचा राहुल गांधींना दणका, २०२४ निवडणुक लढवता येणार नाही? | पुढारी

Rahul Gandhi in 2024 Elections : गुजरात उच्च न्यायालयाचा राहुल गांधींना दणका, २०२४ निवडणुक लढवता येणार नाही?

पुढारी ऑनलाईन डेस्क : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ‘मोदी’ आडनावाबाबत केलेल्या टिप्पणीनंतर गुजरात उच्च न्यायालयाने त्यांची खासदारकी रद्द केली होती. राहुल गांधी यांनी न्यायालयाने दिलेली शिक्षा माफ व्हावी, यासाठी याचिका दाखल केली होती. दरम्यान, गुजरात उच्च न्यायालयाने राहुल गांधी यांची ही याचिका फेटाळली आहे. राहुल गांधी यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. (Rahul Gandhi in 2024 Elections)

मोदी आडनावाच्या टिप्पणीवरून मानहानीच्या खटल्यात त्यांची शिक्षा रोखण्याची विनंती गुजरात उच्च न्यायालयाने आज फेटाळल्यानंतर राहुल गांधी लोकसभा खासदार म्हणून अपात्र ठरतील. (Rahul Gandhi in 2024 Elections) ही शिक्षा न्याय्य, योग्य आणि कायदेशीर आहे, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

राहुल गांधी यांना २०२४ ची निवडणुक लढता येणार? (Rahul Gandhi in 2024 Elections)

शिवाय, न्यायालयाच्या या निर्णयामुळे राहुल गांधी यांना २०२४ ची निवडणुक लढविणे कठीण झाले आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याचा निर्णय घेतला आहे. राहुल गांधी यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने त्यांची शिक्षा त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिल्यास किंवा गुजरात उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध निकाल दिल्यास राहुल गांधी २०२४ ची निवडणुक लढवू शकतील. (Rahul Gandhi in 2024 Elections)

 

हेही वाचलंत का?

Back to top button