Jitendra Awhad vs Ajit Pawar: अजित पवारांना राक्षसी महत्त्वाकांक्षा, काकांना गिळायला निघालेत : आव्हाड

Jitendra Awhad vs Ajit Pawar: अजित पवारांना राक्षसी महत्त्वाकांक्षा, काकांना गिळायला निघालेत : आव्हाड
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : Jitendra Awhad vs Ajit Pawar : काकांना गिळून अजित पवारांनी राक्षसी महत्त्वाकांक्षा दाखवली आहे. शरद पवारांनी वटवृक्ष निर्माण केला. त्यांनाच घरट्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. ज्याच्याकडे वय नाही त्याला हटवण्यासाठी इतका अटापिटा का करताय? तुम्हाला सत्तेत आणलं, सगळी पदे भोगायला दिली. तुम्हाला सगळे दिले हीच शरद पवारांची चूक झाली, असे प्रत्युत्तर जितेंद्र अव्हाड यांनी अजित पवार यांना दिले.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोरीनंतर शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्यात जुंपली आहे. दोन्ही गटांकडून आज मुंबईत शक्तीप्रदर्शन करण्यात आले. अजित पवार गटाकडून मुंबईतील एमईटी कॉलेजमध्ये तर शरद पवार गटाकडून वाय बी चव्हाण सेंटर सभागृहात मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यांतून दोन्ही गटातील नेत्यांनी आपापल्या भूमिका स्पष्ट केल्या.

अजित पवार यांनी शरद पवार गटाचे आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावरही अप्रत्यक्षपणे टीका केली. ठाण्यातील तो पठ्ठा, त्यांच्यामुळे गणेश नाईक, संदीप नाईक, सुभाष भोईर, निरंजन डावखेरे असे पक्ष सोडून गेले, असा आरोप अजित पवारांनी केला. त्याच आरोपांना जितेंद्र आव्हाडांनी बुधवारी संध्याकाळी पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिले.

आव्हड म्हणाले की, माझ्या मागे फक्त शरद पवार आहेत. मला जे बोलायचे आहे, ते तुम्ही बोलू शकता. पण शरद पवारांवर जे काही बोलला आहात, त्याच्याविरोधात मी उभा आहे. अजित पवार आपल्या काकांनाच गिळून टाकायला निघालेत. शरद पवारांनी कोणाचीही महत्त्वाकांक्षां रोखली नाही. पण त्यांनाच आज खूर्चीवरून दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. शरद पवारांवर कसा दबाव टाकला होता हे सगळ्यांना माहिती आहे. अजित पवारांनी सगळ्या गोष्टी लपवून ठेवल्या. पैशाने सगळे विकत घेता येत नाही, असा टोलाही आव्हाडांनी अजित पवारांना लगावला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news