जितेंद्र आव्हाडांचे मोठे विधान, म्हणाले; ‘महाराष्ट्राचा मोठा व्हिलन शरद पवार…’ | पुढारी

जितेंद्र आव्हाडांचे मोठे विधान, म्हणाले; ‘महाराष्ट्राचा मोठा व्हिलन शरद पवार...’

पुढारी ऑनलाईन डेस्क : पवारांनी वटवृक्ष निर्माण केला त्यांनाच घरट्यातून बाहेर काढता? काकांना गिळून अजित पवारांनी राक्षसी महत्त्वाकांक्षा दाखवली आहे. तुम्हाला सगळं दिलं हीच शरद पवारांची चूक झाली. असे आरोप पवार गटाचे मुख्य प्रवक्ते जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केले. ते आज (दि. ५) पत्रकार परिषदेत बोलत होते.

खोटं बोलून शरद पवारांना बदनाम करु नका. महाराष्ट्राचा मोठा व्हिलन शरद पवार आहेत हे कधीही कोणाला पटणार नाही. मला व्हिलन म्हणा अगर काही म्हणा काही फरक पडत नाही. शरद पवारांवर कसा दबाव टाकला जात होता हे सगळ्यांना माहिती आहे. गुप्त बैठकांमध्ये अनेकदा अजित पवारांनी मला टाळलं होतं असंही आव्हाड यावेळी म्हणाले.

तुम्हाला सत्तेत आणंल, सगळी सुखं भोगायला दिली. आपल्यासाठी कुणी काय केलं? आपण काय करतोय? असा सवाल अजित पवारांना त्यांनी केला. पवारांना पदावरून हटविण्यासाठी त्यांचा आटापिटा सुरु होता. असे ते म्हणाले. मी स्वतंत्र आहे. माझ्या मागे कोणताही बँक बॅलेन्स नसताना आज मी इथपर्यंत आहे. पण माझ्यामागे शरद पवार आहेत. असे आव्हाड यावेळी म्हणाले.

Back to top button