पुढारी ऑनलाईन डेस्क : "आम्ही नेहमीच राष्ट्रवादीच्या विरोधात होतो आणि आजही आहे. आम्ही शरद पवारांच्या विरोधात आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस सरकारमध्ये सामील झाल्यामुळे आमच्या गटातील लोक नाराज झाले कारण आमच्या नेत्यांना हवे ते स्थान मिळणार नाही, अशा शब्दात शिवसेना (शिंदे गट) नेते संजय शिरसाट यांनी अजित पवार सरकार मध्ये सामील झाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस सरकारमध्ये आल्याने आमचे सर्व नेते खूश आहेत हे खरे नाही, अशी खंत त्यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना व्यक्त केली आहे. शिरसाट पुढे म्हणाले की, "राजकारणात जेव्हा एखादा विरोधी गट सरकारमध्ये सामील होत असेल तर त्यांना घ्यावे लागते आणि तेच भाजपने केले. राष्ट्रवादी काँग्रेस आमच्यात सामील झाल्यानंतर आमच्या गटातील लोक नाराज झाले आहेत. आमच्या काही नेत्यांना हवे ते स्थान मिळणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस सरकारमध्ये आल्याने आमचे सर्व नेते खूश आहेत हे खरे नाही. तसे आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना कळवले आहे आणि त्यांना हा प्रश्न सोडवावा लागेल. आम्ही नेहमीच राष्ट्रवादीच्या विरोधात होतो आणि आजही आहे. आम्ही शरद पवारांच्या विरोधात आहोत. शरद पवारांनी उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री म्हणून वापर केला होता. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच शरद पवार सरकार चालवत होते. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच याबाबत निर्णय घेतील, असे शिरसाट यांनी म्हटले आहे.
हेही वाचा :