पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात रविवारी भूकंप झाल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही गटांनी आज मुंबईत बैठका बोलावल्या आहेत. तत्पुर्वी आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार यांच्यामुळेच सर्व आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे कोणामुळे आपण निवडून आलो आहोत हे सर्वांनी मनात ठेवावं, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.
सकाळी ११ वाजता अजित पवार यांची तर दुपारी १ वाजता शरद पवार यांची बैठक होणार आहे. राष्ट्रवादीच्या 'दोन' बैठकांमुळे राज्यभरातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संभ्रमात असल्याचे दिसून येत आहे. दोन्ही गटांना किती आमदारांचा पाठिंबा आहे हे आजच्या बैठकीनंतर स्पष्ट होणार असल्याने सर्वांचे या बैठकीकडे लक्ष लागले आहे. तत्पुर्वी माध्यमांशी बोलताना रोहित पवार म्हणाले की, शरद पवार यांच्यामुळे सर्वजण निवडून आलेले आहेत. मी कोणत्याही आमदाराला फोन केलेला नाही, कारण हक्काने सांगण्याचा शरद पवार आणि अजित पवार यांना आहे. जे नेते अजित पवार यांच्याकडे गेले आहेत त्यांना बोलण्याचा इतरांना अधिकार नाही, असेही रोहित पवार यांनी म्हटले आहे.
हेही वाचा :