आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणातील ( aryan Khan arrest case ) साक्षीदार असलेले किरण गोसावी ( Kiran Gosavi ) पुणे पोलिसांसमोर शरण येणार असल्याचे वृत्त समोर येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून किरण गोसावी हे फरार असल्याची चर्चा आहे. किरण गोसावी यांचे बॉडीगार्ड प्रभाकर साईल यांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध करून गंभीर आरोप केले आहेत. त्यांचे हे सर्व आरोप किरण गोसावी यांनी फेटाळले आहेत. आपल्याला धमकीचे फोन येत असून या प्रकरणात अनेक मोठ्या नावांचा सहभाग असल्याचं किरण गोसावी यांनी म्हटलं आहे. ड्रग्स केस दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही किरण गोसावी यांनी केला आहे.
प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे देशातील राजकीय वातावरण तापले असून या प्रकरणात (aryan Khan arrest case) दररोज नवनवे खुलासे होत आहेत. या प्रकरणाशी निगडीत आणि गेल्या काही दिवसांपासून फरार असलेले पंच किरण गोसावीचा (Kiran Gosavi) नेमके कुठे आहेत याचा ठावठिकाणा लागला आहे. किरण गोसावी हे उत्तर प्रदेशमधील (uttar pradesh) लखनऊमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे. किरण गोसावी यांच्यावर या आधीच पुण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे पोलीस त्यांचा शोध घेत आहे.
दरम्यान किरण गोसावी यांनी आणखी एक खुलासा केला आहे. ड्रग्ज प्रकरणी ताब्यात घेतल्यानंतर आर्यन खान याने आईवडिलांशी बोलायचे आहे, त्यांना फोन करा, अशी विनंती माझ्याकडे केली होती, असा दावा गोसावी यांनी केला आहे. तसेच याप्रकरणातील पंच प्रभाकर साईल याने केलेले सर्व आरोप निराधार असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.
आर्यन खानसोबतची सेल्फी व्हायरल झाल्याने केपी गोसावी हे चर्चेत आले होते. रविवारी गोसावी यांच्या अंगरक्षक प्रभाकर साईल यांनी समीर वानखेडे आणि केपी गोसावी यांच्यावर गंभीर आरोप केले. आर्यन खानची सुटका करण्यासाठी २५ कोटींचे लीड झाले होते. यातील ८ कोटी रुपये समीर वानखेडे यांना देण्यात येणार होते, असा दावा साईल यांनी केला होता.
'इंडिया टूडे'शी बोलताना केपी गोसावी यांनी सांगितले की, प्रभाकर साईल याला मी ओळखतो. तो माझ्याबरोबरच काम करत होता. त्याने कोणत्या स्वरुपाचे आरोप केले आहेत हे मला माहित नाही. ११ ऑक्टोबरपासून मी त्याच्या संपर्कात नाही.
माझ्याविरोधात पुणे जिल्ह्यात एक गुन्हा दाखल आहे. अचानक या प्रकरणी तपास सुरु झाला आहे. पोलिस माझा शोध घेत आहेत. माझ्या जीवाला धोका आहे. तसेच मला जीवे मारण्याची धमकीचे मेसेजही येत असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. ६ ऑक्टोबरपासून आपण एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखडे यांच्या संपर्कात नाही, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, परदेशात नोकरीच्या आमिषाने तरुणांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी २०१८ मध्ये गोसावीविरोधात पुणे पाेलिसात गुन्हा दाखल झाला होता. मलेशियात नोकरी देण्याचे आमिष दाखवून त्याने तरुणाकडून ३ लाख रुपये लाटल्याचे तक्रारीमध्ये म्हटलं होते. आता गोसावी यांचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांची दोन पथकं तयार केली आहेत. मात्र गोसावी हे याचे लोकेशन मिळत नाही. त्यामुळे आता अन्य राज्यातही त्यांचा शोध घेतला जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.