समीर ज्ञानदेव वानखेडे की समीर दाऊद वानखेडे? वाशिममधील सख्ख्या चुलत्यांनीच केला खुलासा ! | पुढारी

समीर ज्ञानदेव वानखेडे की समीर दाऊद वानखेडे? वाशिममधील सख्ख्या चुलत्यांनीच केला खुलासा !

वाशिम : अजय ढवळे

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या दाखल्यावरून चर्चा सुरु झाली आहे. अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी दाखला सोशल मीडियात व्हायरल होऊ लागल्याने समीर वानखेडे प्रचंड संतापले आहेत.

व्हायरल होत असलेल्या दाखला खोटा असून, या खोडसाळपणा विरोधात मी कोर्टात आव्हान देणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. समीर वानखेडे यांनी तुम्हाला खरी माहिती पाहिजे असेल तर ती घेण्यासाठी माझ्या मूळ गावी वरुड तोफा, ता. रिसोड जि.वाशिम येथे जा आणि तपासा असे सांगितले.

समीर वानखेडे वाशिम जिल्ह्यातील

समीर ज्ञानदेव वानखेडे यांच मुळ गाव वाशिम जिल्ह्यातील वरुड तोफा हे असून या गावात त्यांची वडिलोपार्जित जमीन व घर आहे. सध्या त्यांचे काका शंकरराव कचरूजी वानखेडे हे सेवानिवृत्त आहे. ते सध्या वाशिम शहरातील लाखाळा परिसरात वास्तव्यास आहेत.

दरम्यान, त्यांच्या घरी जाऊन समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव कचरूजी वानखेडे यांचे मूळ कागदपत्रे पाहिली असता त्यांचे जातीचे प्रमाणपत्र हे अनुसूचित जातीचे असल्याचे स्पष्ट झाले.

माझा भाऊ ज्ञानदेव कचरूजी वानखेडे हे मुंबईला लोखंडवाला परिसरात राहत असल्याने त्यांना टोपण नाव दिल असेल, मात्र हे राजकिय आरोप आहेत. माझ्या भावाचं नाव ज्ञानदेव कचरूजी वानखेडे हेच तर पुतण्याचे नाव समीर ज्ञानदेव वानखेडे हेच असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

हे ही वाचलं का?

Back to top button