Stock Market Opening | सेन्सेक्सची तेजीत सुरुवात, निफ्टी विक्रमी उच्चांकाजवळ | पुढारी

Stock Market Opening | सेन्सेक्सची तेजीत सुरुवात, निफ्टी विक्रमी उच्चांकाजवळ

पुढारी ऑनलाईन : शेअर बाजारातील सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टीने (Nifty) बुधवारी (दि. २१) तेजीत सुरुवात केली. जागतिक बाजारातून कमकुवत संकेत असतानाही शेअर बाजारात खरेदी दिसून येत आहे. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स सुमारे २३० अंकांनी वाढून ६३,५५० वर पोहोचला. तर निफ्टी १८,८५० वर व्यवहार करत आहे. बहुतांश आशियाई बाजार लाल चिन्हात व्यवहार करत आहेत. असे असतानाही भारतीय शेअर बाजार तेजीचे वातावरण आहे. (Stock Market Opening)

काल सेन्सेक्स ६३,३२७ वर बंद झाला होता. आज तो ६३,४६७ वर खुला झाला. सेन्सेक्सवर पॉवर ग्रिड, अल्ट्राटेक, विप्रो, एचडीएफसी बँक, एचडीएफसी, हिंदुस्तान युनिलिव्हर, एलटी, टेक महिंद्रा, बजाज फिनसर्व्ह हे शेअर्स वाढले आहेत. तर सन फार्मा, टाटा स्टील, एनटीपीसी, टाटा मोटर्स, एशियन पेंट्स, इन्फोसिस, आयसीआयसीआय हे शेअर्स घसरले आहेत. (Stock Market Opening)

मीडिया, रिअल्टी स्टॉक्स आज सर्वाधिक वाढले आहेत. दरम्यान, सुरुवातीच्या व्यवहारात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया २ पैशांनी घसरून ८२.११ वर आला.

 हे ही वाचा :

Back to top button