Stock Market Closing | आधी बाजाराचा मूड बिघडला नंतर रिकव्हरी, जाणून घ्या कोणते फॅक्टर्स ठरले महत्त्वाचे? | पुढारी

Stock Market Closing | आधी बाजाराचा मूड बिघडला नंतर रिकव्हरी, जाणून घ्या कोणते फॅक्टर्स ठरले महत्त्वाचे?

पुढारी ऑनलाईन : जागतिक बाजारातून कमकुवत संकेत आणि मान्सूनला झालेल्या विलंबामुळे आज मंगळवारी (दि. २० जून) सुरुवातीला शेअर बाजाराचा मूड बिघडला होता. पण त्यानंतर बाजारात रिकव्हरी दिसून आली. सेन्सेक्स (Sensex) १५९ अंकांनी वाढून ६३,३२७ वर बंद झाला. तर निफ्टी ६१ अंकांच्या वाढीसह १८,८१६ वर स्थिरावला. (Stock Market Closing)

आजच्या ट्रेडिंग सत्रात ऑटो आणि एफएमसीजी शेअर्सवर अधिक दबाव राहिला. पण मिडकॅप शेअर्समध्ये चांगली रिकव्हरी दिसून आली. चीनच्या मध्यवर्ती बँकेने व्याजदरात कपात केल्याने मेटल शेअर्समध्ये तेजी आली. मेटल शेअर्स १ टक्क्यानी वाढले. जेएसडब्ल्यू, टाटा स्टील यात खेरदी दिसून आली. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स (Sensex) २८० अंकांनी घसरून ६३ हजारांच्या खाली आला होता. तसेच निफ्टीही (Nifty) १८,७०० च्या खाली राहिला. पण त्यानंतर आयटी शेअर्समधील खरेदीमुळे बाजारात खालच्या स्तरावरुन रिकव्हरी दिसून आली.

‘हे’ शेअर्स वधारले, ‘हे’ घसरले

सेन्सेक्सवर टाटा मोटर्स, एचसीएल टेक, पॉवर ग्रिड, टेक महिंद्रा, कोटक बँक, एनटीपीसी, विप्रो, ॲक्सिस बँक, एलटी, नेस्ले इंडिया हे शेअर्स वाढले. तर बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, सन फार्मा, एम अँड एम, मारुती, एसबीआय, अल्ट्राटेक सिमेंट, इंडसइंड बँक हे शेअर्स घसरले.

IIFL सिक्युरिटीजला फटका

IIFL सिक्युरिटीजचे शेअर्स १९ टक्क्यांनी खाली आले. सेबीने कंपनीच्या स्टॉकब्रोकिंग युनिटला ग्राहकांच्या निधीच्या कथित गैरवापराचा हवाला देऊन दोन वर्षांसाठी कोणत्याही नवीन क्लायंटला ऑनबोर्डिंग करण्यास बंदी घातली आहे. या पार्श्वभूमीवर IIFL सिक्युरिटीजचा शेअर्स घसरून ५८ रुपयांवर आला. (IIFL Securities Share Price) ब्लॉक डीलच्या पार्श्वभूमीवर एचडीएफसी अॅसेट मॅनेजमेंट कंपनीचे शेअर्स ९ टक्के वाढले.

इंडिगोच्या शेअर्समध्ये तेजी, ‘हे’ ठरले कारण

बीएसईवर मंगळवारच्या व्यवहारात इंटरग्लोब एव्हिएशन (इंडिगो) चे शेअर्स (Shares of InterGlobe Aviation) सुमारे ३ टक्के वाढून ५२ आठवड्यांच्या उच्चांकी २,५०० वर पोहोचले. भारतातील सर्वात मोठ्या या एअरलाईनने ५०० एअरबस A320 एअरक्राफ्टची ऑर्डर दिल्यानंतर इंडिगोचे शेअर्स वधारले.

HDFC च्या ‘या’ कंपनीचा शेअर्स वधारला

एचडीएफसी ग्रुपमधील एका कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी राहिली. सुरुवातीच्या व्यवहारात HDFC AMC चा शेअर सुमारे ९ टक्क्यांहून अधिक वधारला. आज या शेअरमध्ये एक मोठी ब्लॉक डील झाली. त्यानंतर हा शेअर वधारला. HDFC AMC मध्ये अॅसेट मॅनेजर अबर्डन इन्व्हेस्टमेंट ४,१२६ कोटी रुपयांपर्यंत (सुमारे 10.20 टक्के) शेअर्स विकू शकते. Abrdn Investment Management ही कंपनी आधी स्टँडर्ड लाईफ कंपनी म्हणून ओळखली जात होती.

गुंतवणूकदारांकडून विक्रीचा सपाटा

परदेशी संस्थागत आणि देशांतर्गत गुंतवणूकदारांकडून सोमवारी भारतीय शेअर्सच्या विक्रीवर जोर दिसून आला. एनएसईच्या आकडेवारीनुसार, परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी सोमवारी १,०३१ कोटी रुपयांच्या भारतीय शेअर्स विक्री केली, तर देशांतर्गत गुंतवणूकदारांनी ३६५ कोटी रुपयांचे शेअर्स विकले.

आशियाई बाजारातील स्थिती

चीनकडून अर्थव्यवस्थेशी संबंधित जोखीम कमी करणाऱ्या नवीन कोणत्याही उपाययोजना नसल्यामुळे आशियाई बाजार घसरले. चिनी मध्यवर्ती बँकेने मंगळवारी बेंचमार्क कर्ज दर कमी केले. ही कपात पुरेशी नसल्यामुळे गुंतवणूकदार नाराज झाले आहेत. परिणामी याचे पडसाद आशियाई बाजारात उमटले.

MSCI चा जपानबाहेरील आशिया-पॅसिफिक शेअर्सचा व्यापक निर्देशांक ०.६९ टक्के घसरला. हाँगकाँगचा हँगसेंग १.३५ टक्के घसरला आहे. जपानचा निक्केई निर्देशाक (Nikkei 225 index) सुरुवातीला घसरला होता. पण हे नुकसान भरून काढत निक्केई ०.०६ टक्के वाढून ३३,३८८ वर बंद झाला. तर टॉपिक्स निर्देशांक (Topix index) ०.२९ टक्के घसरून २,२८३ वर आला.

हे ही वाचा :

Back to top button