MP Shrikant Shinde : मुख्यमंत्री पुत्र श्रीकांत शिंदे तडकाफडकी दिल्ली दौऱ्यावर

MP Shrikant Shinde : मुख्यमंत्री पुत्र श्रीकांत शिंदे तडकाफडकी दिल्ली दौऱ्यावर

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासंदर्भात प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमुळे भाजप-शिंदे गटामध्ये तणाव निर्माण झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे तडकाफडकी दिल्लीत दाखल झाले. मंगळवारी रात्री शिंदे राजधानीत आले होते. दरम्यान, वैयक्तिक कामासाठी शिंदे दिल्लीत होते, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे. पंरतु, दिल्ली भेटीदरम्यान शिंदे यांनी भाजप नेत्यांची भेटीगाठी घेतल्याची शक्यता वर्तवली जात आहे. (MP Shrikant Shinde)

मंगळवारी छापून आलेल्या जाहिरातीवर भाजप नेत्यांनी आक्षेप नोंदवला होता. दुसऱ्या दिवशीही भाजप नेत्यांकडून या जाहिरातीच्या हेतूवर संशय व्यक्त करण्यात आला. राजकीय वातावरण तापले असतांना बुधवारी दुसरी सुधारित जाहिरात देण्यात आली. अशात 'जाहिराती'मुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असताना श्रीकांत शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत. बुधवारी दुपारी पुन्हा नियोजित कार्यक्रमानूसार शिंदे मुंबईकडे रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news