Kolhapur bandh : कोल्‍हापूरमधील अशांततेला कोण जबाबदार? अजित पवारांचा राज्‍य सरकारला सवाल | पुढारी

Kolhapur bandh : कोल्‍हापूरमधील अशांततेला कोण जबाबदार? अजित पवारांचा राज्‍य सरकारला सवाल

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : कोल्‍हापूरमधील अशांततेला कोण जबाबदार आहे, असा सवाल करत निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्‍यात अशांतता निर्माण केली जात आहे, असा आरोप विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी आज ( दि.७) माध्‍यमांशी बोलताना केला. ( Kolhapur bandh )

Kolhapur bandh : पोलिसांच्‍या कामात राजकीय हस्‍तक्षेप करु नका

आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्‍यात दंगली घडवून आणण्‍याचा डाव आहे, हे तपासावे लागेल. शांतताप्रिय कोल्‍हापूर शहरात अशांतता निर्माण करण्‍याचा कोण प्रयत्‍न करत आहे, याचा छडा राज्‍य सरकारने लावावा, असेही अजित पवार म्‍हणाले. आगामी निवडणूका डोळ्यासमोर ठेवून दंगली घडत आहेत का?, कोल्हापूरातील घटनेमागे कोण याचा शोध घ्यावा, दंगली हाताळण्यासाठी पोलिसांना फ्री हँड द्यावा, पोलिसांच्‍या कामात राजकीय हस्‍तक्षेप करु नका, महाराष्‍ट्रातील पोलीस हे समाजकंटकांवर धडक कारवाई करण्‍यास समर्थ आहेत, पोलिसांना कारवाईची मोकळीक देण्‍यात यावी, असेही ते म्‍हणाले.

आक्षेपार्ह स्‍टेटस ठेवण्‍याची सखोल चौकशी व्‍हावी. संबंधित कोणत्‍याही राजकीय पक्षाचा असेल तर त्‍याच्‍यावर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे, असेही ते म्‍हणाले.

हेही वाचा

Back to top button