मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मुंबईतील गजबजलेल्या भायखळ्यातील घोडपदेव परिसरात असलेल्या हारुसिंग शोभराज नावाच्या चाळीत भीषण आग लागली आहे. या चाळीतील चार घरे आगीच्या भष्यस्थानी पडली आहेत. आग लागल्यानंतर येथील रहिवाशांना तातडीने बाहेर काढण्यात आले. आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले आहेत. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती समोर आली आहे. अग्निशमन दलाच्या कॉटन ग्रीन येथील गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
हेही वाचा :