Munmun Dhamecha : ‘पब्लिसिटीसाठी समीर वानखेडेंनी मला फसवलं’

मुनमुन धमेचा-समीर वानखेडे
मुनमुन धमेचा-समीर वानखेडे
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूड स्टार शाहरुख खानच्या मुलासह अटक करण्यात आलेल्या कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील मॉडेल मुनमुन धमेचा हिने एनसीबीचे वादग्रस्त माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. (Munmun Dhamecha ) धामेचाने मौन सोडले. तिने एका इंग्रजी वेबसाईटशी बातचीत केली. माध्यमांचे लक्ष वेधून घेण्याच्या उद्देशाने वानखेडे यांनी मॉडेल म्हणून तिला फसवल्याचा आरोप धामेचाने केला आहे. (Munmun Dhamecha )

क्रूझवर ड्रग्ज मिळाल्याचा आरोप असलेली मॉडेल मुनमुन धमेचा हिने नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (NCB) माजी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. वानखेडे यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रसिद्धीसाठी आपल्याला आपल्याला फसवल्याचे म्हटले आहे.

मॉडेल मुनमुन धमेचाने केले आरोप 

मॉडेल मुनमुन धमेचाने आरोप केले की, ड्रग्ज सापडले तिथे आणखी दोन व्यक्ती देखील उपस्थित होत्या. परंतु दोघांनाही सोडून देण्यात आले. मीडियाचे लक्ष वेधण्यासाठी केवळ मुनमुन धमेचाला चित्रपट उद्योगाशी संबंधित असल्यामुळे अटक करण्यात आली.

भीतीने मी गप्प बसले – धमेचा

धामेचाने सांगितले की, ती भीतीपोटी गप्प बसली होती. पण आता सीबीआयने वानखेडेवर गुन्हा दाखल केल्याने सत्य बाहेर येण्याची अपेक्षा आहे. समीर वानखेडेंनी प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्धीसाठी मुनमुन धमेचासारख्या अनेक लोकांना गोवले आहे, असा आरोप त्यांनी केलाय.

धमेचा पुढे म्हणाली, "सुरुवातीला, वानखेडे यांनी मला आश्वासन दिले की, काळजी करण्यासारखे काहीही नाही. कारण याप्रकरणात माझ्याविरोधात काहीही दोषी आढळले नाही आणि मला जाण्यापूर्वी ते आवश्यक औपचारिकता पूर्ण करतील. मात्र, मी मॉडेल असल्याचे समजताच त्यांनी मला अटक करण्याची कारवाई केली. नंतर, मला कोर्टात हजर करण्यात आले आणि त्यांनी मला माझ्या कुटुंबीयांशीदेखील बोलूही दिले नाही."

धमेचा म्हणाली-तिला तिचा वकील बदलण्यास भाग पाडले गेले आणि वानखेडे आणि तिच्या टीमने शिफारस केलेल्या एकाची निवड करण्यास भाग पाडले.

ऑक्टोबर २०२१ मध्ये अटक 

ऑक्टोबर २०२१ च्या पहिल्या आठवड्यात, एनसीबीने मुनमुन धमेचासह आर्यन खान आणि इतरांना अंमली पदार्थ बाळगणे, सेवन आणि तस्करीच्या आरोपाखाली अटक केली होती. मुनमुन धमेचा आणि आर्यन खान यांना २८ ऑक्टोबर, २०२१ रोजी मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. पुराव्याअभावी एनसीबीने मे २०२२ मध्ये दाखल केलेल्या आरोपपत्रात आर्यन खान आणि इतर पाच जणांची नावे नसली तरी एनसीबीने दाखल केलेल्या आरोपपत्रात धमेचाचे नाव आरोपी म्हणून ठेवण्यात आले होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news