विधानसभा अध्यक्षांवर राऊतांची पुन्हा टीका; म्हणाले, त्यांनी आधी... | पुढारी

विधानसभा अध्यक्षांवर राऊतांची पुन्हा टीका; म्हणाले, त्यांनी आधी...

पुढारी ऑनलाईन डेस्क : “शिंदे सरकारमुळे महाराष्ट्र दिल्लीच्या दारातील पायपुसणं झालंय. शिंदे सरकारचा पोपट मेलाय फक्त नार्वेकरांकडून जाहीर करणं बाकी आहे. नार्वेकर बोलतायत की विधानसभा अध्यक्ष? ते कोणत्या भूमिकेतून बोलत आहेत ते त्यांनी आधी सांगाव,” अशी पुन्हा टीका ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर केली.

संजय राऊत आज नाशीक दौऱ्यावर जाणार आहेत. तत्पुर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. आधी फडणवीस शहाणे आहेत असं वाटलं होतं आणि बाकीचे मुर्ख, पण आता शहाणपणाची व्याख्या बदलावी लागेल, अशा शब्दात राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. राऊत म्हणाले की, बेकायदेशीर सरकारचे आदेश पाळणे अयोग्य आहे. बेकायदेशीर सरकार बोलल्यावर माझ्यावर गुन्हा दाखल केला आहे. शिंदे सरकार माझ्या दृष्टीने बेकायदेशीरच आहे. राज्य सरकार पोलिस खात्यावर दबाव टाकत आहे. देशातील हुकूमशाही विरोधात आमचा लढा असल्याचे राऊत यांनी सांगितले.

हेही वाचा : 

Back to top button