Karnataka CM decision | कर्नाटक मुख्यमंत्रीपदाचा सस्पेन्स कायम, सिद्धरामय्यांचे पारडे जड?, डी. के. शिवकुमार आज दिल्लीला जाणार

Karnataka CM decision | कर्नाटक मुख्यमंत्रीपदाचा सस्पेन्स कायम, सिद्धरामय्यांचे पारडे जड?, डी. के. शिवकुमार आज दिल्लीला जाणार
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला स्पष्ट जनादेश मिळाल्यानंतर कर्नाटकचा नवा मुख्यमंत्री कोण? यावरुन अजूनही सस्पेन्स कायम आहे. दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार (Karnataka Congress president DK Shivakumar) आज दिल्लीला जाणार आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या (Congress leader Siddaramaiah) कालच दिल्लीत दाखल होऊन तेथे तळ ठोकून आहेत. तर शिवकुमार पोटदुखीने त्रस्त असल्याने बंगळूरमध्ये राहिले. शिवकुमार काल दिल्लीला गेले नसल्याने राजकीय वर्तुळातून अनेक तर्कवितर्क लढवण्यात आले होते. (Karnataka CM decision)

१३५ नवनिर्वाचित काँग्रेस आमदारांची रविवारी संध्याकाळी बंगळूरमध्ये बैठक झाली आणि त्यांनी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचा (CLP) नेता निवडण्यासाठी एक ओळीचा ठराव मंजूर केला. यादरम्यान प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते सिद्धरामय्या यांच्या हॉटेलच्या बाहेर जमलेल्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या हे कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे, असे वृत्त न्यूज १८ ने दिले आहे. बहुतांश आमदारांना सिद्धरामय्या हेच मुख्यमंत्रीपदी हवे आहेत. पण काँग्रेसने कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाच्या नावाची अद्याप औपचारिक घोषणा केलेली नाही, असेही वृत्तात पुढे म्हटले आहे.

असा आहे काँग्रेसचा फॉर्म्युला

कर्नाटकचा नवा मुख्यमंत्री कोण? सिद्धरामय्या की शिवकुमार? याचा फैसला करण्याची कठीण जबाबदारी पक्षाध्यक्षांवर सोपवण्यात आल्यानंतर सोमवारी राजकीय घडामोडींना वेग आला होता. या दोन्ही नेत्यांना दिल्लीत पाचारण करण्यात आले होते. त्यानुसार सिद्धरामय्या दिल्लीला पोहोचले, मात्र पोटदुखी आणि उच्च रक्तदाबाचे कारण देत शिवकुमार बंगळूरमध्येच थांबले. दरम्यान, पहिली दोन वर्षे सिद्धरामय्या आणि नंतरची तीन वर्षे शिवकुमार मुख्यमंत्रिपदावर राहतील, हा फॉर्म्युला शिवकुमार यांनी फेटाळल्याचे सूत्रांनी सांगितले.

सोमवारी सकाळी सिद्धरामय्या तातडीने दिल्लीला रवाना झाले, तर वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी शिवकुमार कर्नाटकातच थांबून राहिले. त्यांनाही तातडीने दिल्लीला बोलावण्यात आले होते. मात्र, सायंकाळी त्यांना पोटदुखी आणि उच्च रक्तदाबाचा त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्यांनी दिल्लीला जाणे सोमवारी तरी टाळले होते.

राज्यात दोन दिग्गज नेते मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असल्याने नाराजीचा धोका स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे वेगवेगळे फॉर्म्युले समोर येत आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रारंभीची दोन वर्षे सिद्धरामय्या आणि नंतरची तीन वर्षे शिवकुमार, असा फॉर्म्युला सुचवण्यात आला होता. विधानसभा निवडणुकीची यंत्रणा हाताळण्याची शिवकुमार यांनी केलेली कामगिरी लोकसभेलाही उपयुक्त पडेल, असे सांगण्यात आले होते. मात्र, तो फॉर्म्युला शिवकुमार यांनी फेटाळल्याचे वृत्त आहे. राजस्थानात अशाच फॉर्म्युल्यामुळे तिढा निर्माण झाल्याने असे कालावधी वाटप नको, अशी भूमिका शिवकुमार यांनी घेतली. (karnataka election news)

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news