जेईई मुख्य परीक्षेला बारावीत ७५% गुणांची अट कायम

जेईई मुख्य परीक्षेला बारावीत ७५% गुणांची अट कायम

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : आयआयटी, एनआयटी, आयआयआयटीच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या जेईई मेन परीक्षेच्या पात्रतेसाठी बारावी परीक्षेत ७५ टक्के गुणांची घालण्यात आलेली अट शिथिल करण्याची विद्यार्थ्यांची मागणी उच्च न्यायालयाने बुधवारी फेटाळली.

प्रभारी मुख्य न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठाने केंद्रीय परीक्षा संस्थेच्या (एनटीए) निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार दिला. याबाबत सरकारने विचार केला पाहिजे, असेही स्पष्ट केले. एनटीएने १५ डिसेंबरला काढलेल्या अधिसूचनेत आयआयटीत प्रवेशासाठी ७५ टक्के गुणांचा पात्रता निकष निश्चित केला होता.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news