अजित पवार मुख्यमंत्री होणारच; अमित शहांनाही मान्य : अमोल मिटकरींचा खळबळजनक दावा | पुढारी

अजित पवार मुख्यमंत्री होणारच; अमित शहांनाही मान्य : अमोल मिटकरींचा खळबळजनक दावा

पुढारी ऑनलाईन डेस्क : “महाराष्ट्राच राजकारण संभाळेल असा अजित पवार यांच्यासारखा तोलामोलाचा नेता सध्या महाराष्ट्रात नाही. हे दस्तुरखुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कबुल केलं आहे. अजित पवार मुख्यमंत्री होणारच आहेत वेट अँड वॉच, असा खळबळजनक दावा राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे. बीड येथील एका कार्यक्रमात मिटकरी यांनी हा दावा केला. मिटकरींच्या या वक्तव्यामुळे राज्यात पुन्हा एकदा अजित पवार मुख्यमंत्री होण्याच्या चर्चेला उधाण आलं आहे.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या ‘मुख्यमंत्री व्हायला आवडेल’ या वक्तव्यानंतर महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर अनेक चर्चा रंगल्या. ते राष्टवादी सोडून भाजपमध्ये जाणार असल्याच्याही चर्चा सुरू झाल्या. पण अजित पवार यांनी जीवात जीव असेपर्यंत राष्ट्रवादी सोडणार नाही, असे सांगत चर्चांना पुर्णविराम दिला. आता पुन्हा अमोल मिटकरी जे अजित पवार यांचे निकटवर्तीय समजले जातात त्यांनीच अजित पवारच मुख्यमंत्री होणार असे वक्तव्य केले आहे. दिल्लीतून हालचाली सुरू आहेत. एकनाथ शिंदे सक्तीच्या रजेवर गेले आहेत, त्याचा याच्याशी संबंध लावू नका. महाविकास आघाडीच सरकार महाराष्ट्रात येणार आणि अजित पवार मुख्यमंत्री पदावर दिसतील, असा दावा मिटकरींनी केला आहे.

हेही वाचा : 

Back to top button