पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादी विकासाच्या आड नाही, पण विकास साधत असताना पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याची काळजी घ्यावी. सर्वेक्षण थांबवून स्थानिकांचे प्रश्न चर्चेतून सोडवावेत. बारसूतील आंदोलकांवर बळाचा वापर करू नका, असे आवाहन विरोधी पक्षनेते अजित पावर यांनी सरकारला केले आहे. आज माध्यमांशी ते बोलत होते.
अजित पवार म्हणाले की, कोकणातील निसर्ग सौंदर्यावर परिणाम न होता प्रकल्प होत असेल तर करावा. पण स्थानिकांचे प्रश्न चर्चेतून सोडवावेत. कोकणातील बराचसा भाग काताळाचा आहे. त्यामुळे सरकारने सर्वेक्षण थांबवून चर्चा करून मार्ग काढावा. जनतेचा विरोध असेल तर जनतेला वाऱ्यावर सोडून चालणार नाही. राष्ट्रवादी विकासाच्या आड नाही, पण विकास साधत असताना पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याची काळजी घ्यावी. लोकांच्या मनातील प्रश्न निकाली निघाले पाहिजेत. सरकारने संवेदनशीलपणे विषय हाताळावा, लोकांच्या भावनांचा आदर केला पाहिजे, पण तसा आदर केला जात नाही, असे पवार यांनी म्हटले आहे. दरम्यान, केंद्रातील प्रमुखांनी ठरवलं आणि इथल्या प्रमुखांनी आग्रही भूमिका घेतली तर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याचा निर्णय होऊ शकतो. याबाबत सरकारला पत्र देणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा :