उघड्यावर शौचास जाणाऱ्या सुनांसाठी सासवांनी केले ‘हे’ काम | पुढारी

उघड्यावर शौचास जाणाऱ्या सुनांसाठी सासवांनी केले 'हे' काम

भोपाळ ; पुढारी वृत्तसेवा : उघड्यावर शौचास जाणे ही आपल्‍या देशाच्या अनेक गंभीर समस्‍यांपैकी एक. अजूनही या समस्‍येचा सामना गावातील महिलांना करावा लागत आहे. त्‍या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशातील भोपाळ जिल्‍ह्यात एका अनोख्या धावण्याच्या स्‍पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ‘लोटा दौड’ असे या स्‍पर्धेचे नाव होते.  भोपाळ जिल्‍हा प्रशासनाने फंदा गावात या स्‍पर्धेचे आयोजन केले होते. या स्‍पर्धेत २० सासवांनी सहभाग घेतला होता. या सासवांनी आपल्‍या सुनांसाठी लोटक्‍यात पाणी भरून दौड लावली. ही अनोखी दौड आता सर्वत्र चर्चेचा विषय झाली आहे.

खुल्‍या जागेत शौचास पायबंद घालणे हाच स्‍पर्धेचा उद्देश

त्‍याच झालं असं की, या स्‍पर्धेचा उद्देश हा खुल्‍या जागेत शौचास जाण्यावर पायबंद घालणे हा होता. खुल्‍यामध्ये शौचास जाण्याविरोधात जनजागृती करण्यासाठी या अनोख्या स्‍पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्‍पर्धेचं नाव ‘लोटा दौड’ असं ठेवण्यात आलं होतं. या स्‍पर्धेत सहभागी झालेल्‍या एक सासूबाई म्‍हणाल्‍या की, मी सुनांना आग्रह करते आता घरांमध्ये शौचालयांची सोय आहे. त्‍यामुळे त्‍यांनी उघड्यावर शौचालयास जावू नये.

सासवांनी स्‍पर्धा जिंकली

स्‍पर्धेत २० सासवांनी सहभाग घेतला. राधा प्रजापति, मंजू प्रजापति आणि अर्पिता प्रजापति यांनी ही स्‍पर्धा जिंकली. त्‍यांनी अनुक्रमे पहिला, दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावला. या अनोख्या स्‍पर्धेत यशस्‍वी झालेल्‍या सासुबाईंना सुनबाईंनी पुष्‍पहार घालून त्‍यांना शुभेच्छा दिल्‍या. यावेळी सुनबाईंनी देखील खुल्‍यामध्ये शौचास न जाण्याची प्रतिज्ञा केली. या स्‍पर्धेत सहभागी झालेल्‍या प्रत्‍येक सासुला आपल्‍या सुनेला खुल्‍या जागेत शौचास जाण्यापासून रोखायचे आहे.

सुनांजवळ पोहचून पाण्याने भरलेला लोटा फेकायचा

या स्‍पर्धेत सासवांनी पाण्याने भरलेला लोटका घेवून जवळपास १०० मीटर पर्यंत धावायचे होते. शेवटी सुनांजवळ पोहचून पाण्याने भरलेला लोटा फेकून द्यायचा होता.कार्यक्रमाचा मुख्य उद्देश खुल्‍या जागेतील शौचाला पायबंद घालणे. गावांमध्ये या विषयी जागरुकता आणणे हा होता. ज्‍या मध्ये खास करून महिलांना खुल्‍या मध्ये शौचास जाणे थांबवणे, हा हाेता.

भोपाळ जिल्‍हा पंचायतच्या मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मिश्रा यांनी म्‍हटलं की, अनेक वर्षांपासून महिला जी गोष्‍ट करत आहेत.त्‍या पासून त्‍यांना परावृत्‍त करणे. आम्‍ही महिलांना यासाठी निवडले. कारण महिलांना स्‍वच्छतेचे महत्‍व पटवून देणं अधिक सोपे आहे.महिलांनी स्‍वत हा प्रकार थांबवून त्‍यांनी इतरांनाही या विषयी प्रेरित कराव असे ते म्‍हणाले.

हेही वाचलं का?

Back to top button