बँकॉकला ठेंगा, दुबई-सिंगापूरला भरभरून प्रतिसाद ; पुणे विमानतळावरून तीन महिन्यांत 45 हजार 415 जणांचा आंतरराष्ट्रीय प्रवास | पुढारी

बँकॉकला ठेंगा, दुबई-सिंगापूरला भरभरून प्रतिसाद ; पुणे विमानतळावरून तीन महिन्यांत 45 हजार 415 जणांचा आंतरराष्ट्रीय प्रवास

प्रसाद जगताप : 

पुणे : पुण्यातून सुरू झालेल्या आंतरराष्ट्रीय विमानसेवेपैकी सिंगापूर आणि दुबईला पुणेकर प्रवाशांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. मात्र, त्याचवेळी प्रवाशांनी बँकॉककडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे. एकीकडे सिंगापूर, दुबई प्रवासाला पुणेकर प्रवाशांचा उत्साह दिसत असून, बँकॉक प्रवासाला मात्र, निरूत्साह दिसत आहे. गेल्या तीन महिन्यांतील विमानतळ प्रशासनाने केलेल्या प्रवाशांच्या नोंदीवरून हे स्पष्ट होत आहे. पुणे विमानतळावरून गेली साडेसतरा वर्षांपूर्वी दुबई विमानसेवा सुरू करण्यात आली. या सेवेला प्रवाशांचा भरभरून प्रतिसाद आहे, तर मागील वर्षाअखेरीस केंद्रीय हवाई राज्यमंत्री ज्योतिरादित्य सिंधीया यांनी पुण्यातून आंतरराष्ट्रीय सेवा वाढविण्याची घोषणा केली होती. त्यानुसार पुण्यातून सिंगापूर आणि बँकॉकला सेवा सुरू झाली, यातील सिंगापूरला चांगला प्रतिसाद असून, बँकॉकची सेवा बंद होण्याच्या मार्गावर आली आहे.

पुण्यातून आखाती देशांत जाणार्‍या प्रवाशांची संख्या जास्त असते. अलीकडेच सुरू झालेल्या सिंगापूर सेवेलासुध्दा चांगला प्रतिसाद असून, सिंगापूरला जाणार्‍यांमध्ये कॉर्पोरेट कंपन्या, अधिकारी वर्गांची संख्या अधिक असते. तसेच, बँकॉक हॉलिडे डेस्टीनेशन आहे. कोरोनामुळे या देशात बरेच निर्बंध आले होते. येथील स्थिती पूर्वपदावर आल्यास आगामी काळात येथे प्रवाशांचा प्रतिसाद नक्कीच वाढेल.
– धैर्यशील वंडेकर, हवाई वाहतूक तज्ज्ञ

पुण्यातून होणार्‍या दुबई, सिंगापूर आंतरराष्ट्रीय विमानसेवेला पुणेकर प्रवाशांचा चांगला प्रतिसाद आहे. मात्र, बँकॉक सेवेला प्रवाशांचा अजिबात
प्रतिसाद नाही. 

                                              – संतोष ढोके, संचालक, पुणे विमानतळ

Back to top button