सिल्व्हर ओकवर भविष्याची दिशा ठरवण्यावर चर्चा, खरगेंच्यावतीने वेणूगोपाल मातोश्रीवर येणार : संजय राऊत | पुढारी

सिल्व्हर ओकवर भविष्याची दिशा ठरवण्यावर चर्चा, खरगेंच्यावतीने वेणूगोपाल मातोश्रीवर येणार : संजय राऊत

पुढारी ऑनलाईन डेस्क : सिल्व्हर ओकवर भविष्याची दिशा ठरवण्यावर चर्चा झाली, असे सांगत पवार-ठाकरे चर्चेचा अधिक तपशील राऊत यांनी सांगितला नाही. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, मविआमध्ये मतभेद नाहीत. सिल्ह्वर ओकवर अत्यंत सकारात्मक चर्चा झाली. वेणुगोपाल यांनी ठाकरेंची वेळ मागितली आहे. खरगेंच्यावतीने वेणूगोपाल मातोश्रीवर येणार आहेत.

राऊत म्हणाले- चंद्रकांत पाटील चुकीचेच बोलले. पाटलांच्या वक्तव्याचा विपर्यास झाला नाही. चंद्रकांत पाटलांचा राजीनामा घ्या, या निर्णयावर ठाम असून मुख्यमंत्र्यांनी मंत्रीमंडळातून पाटलांना काढलं पाहिजे. हिंमत असेल तर शिंदेंनी राजीनामा मागावा.

खासदार संजय राऊत शुक्रवारपासून नागपुरात असणार आहेत. नागपूरची वज्रमूठ सभा ऐतिहासिक ठरेल, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

 

Back to top button